ठाणे - ठाण्यातील वागळे इस्टेट येथील कैलासनगर भागातील कांबळे चाळीजवळ असलेल्या झाडीत घोणस जातीचा विषारी साप आढळला. घटनास्थळी पोहोचलेल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि सर्पमित्रांनी सापाला शिताफीने पकडले व पिशवीत कैद केले. त्यानंतर य सापाला सर्पमित्र अजय जावीर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यापुढे वन विभागाच्या मदतीने या सापाची रवानगी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात करण्यात येणार आहे.
हेही वाचा - डोळ्यापुढे धूर.. गुदमरणारा श्वास..अन् आक्रोश.. 'झेन'ने सांगितला आगीचा थरार
यापूर्वी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानजवळ असल्याने ठाण्यात आत्तापर्यंत अजगर, विषारी नाग आणि इतर साप आढळत होते. वनविभाग आणि ठाण्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि सर्पमित्र, या सापांना पकडून दूर जंगलात सोडून देण्यात येत होते. मात्र, यावेळी सहा फूट लांबीचा अतिविषारी घोणस साप दिसल्याने आसपासच्या कुटुंबातील लोकांमध्ये घबराट पसरली. सहा फूट लांब साप बघून सर्वच जण थक्क झाले होते.