ETV Bharat / state

Village of Doctors : शेतकऱ्यांनी फुलवला डॉक्टरांचा मळा; ‘डॉक्टरांचे गाव’ अशी ओळख - Gharivali village is known as Doctors Village

ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील ‘घारीवली’ गावाने देखील आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या गावातील मुलांनी वैद्यकीय शिक्षण घेत जिल्ह्यात गावाची ‘डॉक्टरांचे गाव’ अशी ओळख करून दिली. गावातील २० जणांनी डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण करून आज ते वैद्यकीय क्षेत्रात सुविधा देत आहेत. आज गावाच्या वेशीवर त्याचा कौतुक सोहळा तसेच त्यांच्या नावांच्या फलकाचे अनावरण मोठ्या थाटात पार पडले.

Doctors in Thane
डॉक्टरांचे गाव
author img

By

Published : Aug 13, 2023, 10:06 PM IST

Updated : Aug 13, 2023, 10:14 PM IST

ठाणे : शेतकरी आईवडिलांनी काबाड कष्ट करून आपल्या मुलांना शिक्षण दिले. कल्याण शीळ मार्गावर 'घारवली' गावात शेतकऱ्यांची ३० ते ३५ घरे आहेत. या गावात एकेकाळी कोणी आजारी पडला तर रुग्णांना डोंबिवली शहरा शिवाय पर्याय नव्हता. त्यातच गावातच जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन शेतकऱ्यांची मुले पुढील शिक्षणासाठी कोसो दूर जावे लागत होते. विशेष म्हणजे गावातील काही शेतकरी शेतात कष्ट करून घर आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवत होते. तर काही शेतकरी रिक्षाचालकासह इतरही लहानसान कामे करून मुलांनी डॉक्टर व्हावे, ही इच्छा मनात बाळगून डॉक्टरच्या महागड्या शिक्षणांसाठी आर्थिक मदत करत होते.

२० डॉक्टरांचे पाटील आडनाव: ठाणे जिल्हयात घारीवली गावाची ओळख आता डॉक्टरांचे गाव म्हणून झाली आहे. विशेष म्हणजे गावातील सर्वच २० डॉक्टरांचे पाटील आडनाव असून एकाच आगरी समाजाचे आहेत. त्यामुळे पंचक्रोशीतील गावकरी त्यांना पाटलांच्या डॉक्टरांची टीम म्हणून ओळखतात.

गावातील पहिले डॉक्टर : गावातील पहिले डॉक्टर होण्याचा मान डॉक्टर संजय पाटील यांना मिळाला आहे. संजय पाटील यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. विशेष म्हणजे पाटील लहान हे असताना पहिले की, गावात कोणी आजारी झाला तर त्यासाठी वेळेवर डॉक्टर मिळणे कठीण होते. त्यामुळे त्यांना डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगले होते. आता गावात २० डॉक्टर झाले असून प्रत्येक घरात डॉक्टर आहेत. आज डॉक्टर संजय पाटील यांच्या एकाच कुटूंबात पाच डॉक्टर आहेत.

गावात गोरगरीब रुग्णांवर मोफत उपचार करावे : हरिशचंद्र पाटील यांच्या तिन्ही मुलांनी डॉक्टर होण्याचा मान मिळविला आहे. आज त्याचा एक मुलगा आणि दोन मुली डॉक्टर झाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. गावातील आणखी एक शेतकरी सुभाष पाटील हे गावानजीक एका कारखान्यात काम करीत होते. मात्र काही वर्षापूवी हा कारखाना बंद पडला आणि त्यांच्यासह इतरही पालकांवर आर्थिक संकट उभे ठाकल्याचे त्यांनी सांगितले. अश्यातही मुलांचे शिक्षण द्यावे म्हणून इतर लहान सान कामे करून आज माझा मुलगा डेविड हा गावातील २० मुलांसह डॉक्टर झाल्याने याचा मला अभिमान आहे. तसेच गावात एक मोठे रुग्णालय उभारण्याचा मानस आहे. त्या रुग्णालयात गावातील सर्व डॉक्टरांनी यापुढे पंचक्रोशीतील गावात राहणाऱ्या गोरगरीब रुग्णांवर मोफत उपचार करावे असे मत त्यांनी बोलताना व्यक्त केले.

हेही वाचा -

  1. Rare Trees in India : दहीपळस झाड नव्हे तुमचा आहे डॉक्टर... विषाचा प्रभाव कमी करण्यापासून दारूचे व्यसन सोडविणारे 'असे' आहेत फायदे
  2. National Doctors Day 2023 : देशात का साजरा केला जातो डॉक्टर्स 'डे'? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
  3. Medicine Diploma Course : ममता बॅनर्जींकडून डॉक्टर बनण्यासाठी 3 वर्षांच्या डिप्लोमा कोर्सचा प्रस्ताव, तज्ञ म्हणाले, गुणवत्तेचे काय?

माहिती देताना प्रतिनिधी

Last Updated : Aug 13, 2023, 10:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.