ETV Bharat / state

परिवहन सेवेच्या बसमधून गॅस गळती; लोकांच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टाळली - लोकांच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टाळली

ऐन दिवाळीत कल्याण पूर्वेतील मेट्रो माॅलसमोर नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या सीएनजी बसमधून गॅस गळती झाली. मेट्रो माॅल भागातील लोकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडा-ओरडा करुन चालकाला बस थांबवण्याचे सांगितले. चालकाने बस थांबवताच बसच्या सीएनजी टाकीतून गॅस गळती होत असल्याचे निदर्शनास आले. तत्काळ अग्निशमन दलाच्या जवानांनी उपाययोजना करून गॅस गळती रोखली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

परिवहन सेवेच्या बसमधून गॅस गळती
परिवहन सेवेच्या बसमधून गॅस गळती
author img

By

Published : Oct 24, 2022, 5:02 PM IST

ठाणे - ऐन दिवाळीत कल्याण पूर्वेतील मेट्रो माॅलसमोर नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या सीएनजी बसमधून गॅस गळती झाली. मेट्रो माॅल भागातील लोकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडा-ओरडा करुन चालकाला बस थांबवण्याचे सांगितले. चालकाने बस थांबवताच बसच्या सीएनजी टाकीतून गॅस गळती होत असल्याचे निदर्शनास आले. तत्काळ अग्निशमन दलाच्या जवानांनी उपाययोजना करून गॅस गळती रोखली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

परिवहन सेवेच्या बसमधून गॅस गळती

काही दिवसांपूर्वी याच मेट्रो माॅलसमोर नवी मुंबई परिवहन सेवेच्या बसला रात्रीच्या वेळेत अचानक आग लागली होती. ही घटना ताजी असताना आज सकाळच्या सुमारास या उपक्रमातील एका बसमधून गॅस गळती झाली. नवी मुंबई पालिका परिवहन उपक्रमाची एम.एच 43/ एच/ 5200 क्रमांकाची बस सोमवारी सकाळी कल्याणकडे शिळफाटा रस्त्याने येत होती. बसच्या सीएनजी टाकीमधून गॅस बाहेर पडत असल्याचे पादचाऱ्यांच्या निदर्शनास आले. जागरुक नागरिकांनी तत्काळ आरडा-ओरडा केला.

चालकाने बस थांबविल्यानंतर चालकाला सीएनजी गॅस टाकीतून मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर पडत असल्याचे पाहिले. वाहक आणि चालकाने तात्काळ अग्निशमन दलाच्या जवानांना संपर्क केला. जवान घटनास्थळी येताच त्यांनी टाकीवर पाण्याचा मारा करुन गॅस गळती रोखली.हा प्रकार लक्षात आला नसता तर आगीचा भडका उडून मोठा अनर्थ घडला असता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. गॅस गळती कशी झाली ? याचा तांत्रिक तपास परिवहन उपक्रमाच्या तांत्रिक पथकाने सुरू केला आहे. दुसरीकडे बस थांबताच प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.