ETV Bharat / state

Gangster Suresh Pujari : कुख्यात गुंड सुरेश पुजारीला 25 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी - Thane Court

कुख्यात गुंड सुरेश पुजारीला अटक ( Gangster Suresh Pujari ) करण्यात आली आहे. सुरेश पुजारीला फिलिपाईन्समधून अटक केल्यानंतर बुधवारी (दि. 15) ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने गुंड पुजारी यास 25 डिसेंबरपर्यंत ( Suresh Pujari Held To Police Custody ) पोलीस कोठडी सुनावली आहे.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Dec 15, 2021, 7:57 PM IST

ठाणे - महाराष्ट्रातील विविध शहरांमधील अनेक व्यापारी, बांधकाम व्यवसायिक यांच्याकडून खंडणी वसुल करणे, ठार मारण्याची धमकी देणे, हत्येचा प्रयत्न व हत्या, अशी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुंड सुरेश पुजारीला ( Gangster Suresh Pujari ) अटक करण्यात आली आहे. सुरेश पुजारीला फिलिपाईन्समधून अटक केल्यानंतर बुधवारी (दि. 15) ठाणे न्यायालयात ( Thane Court ) हजर करण्यात आले होते. न्यायालयाने गुंड पुजारी यास 25 डिसेंबरपर्यंत ( Suresh Pujari Held To Police Custody ) पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक चौकशीसाठी सुरेश पुजारीला ठाणे एटीएस ( Anti Terrorist Squad ) पथकाने ताब्यात घेतलेले आहे.

मुंबई आणि ठाण्यात पुजारीच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात एकूण 38 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यात खंडणी, धमकावणे, गोळीबार करणे, हत्या करणे सारख्या गुन्ह्यांचा सहभाग आहे. पाच पोलीस ठाण्यात त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाईही करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

  • रेड कॉर्नर नोटीस मुदत संपण्यापूर्वीच अटक

खंडणीखोर गँगस्टर सुरेश पुजारी याच्या विरोधात 20 डिसेंबर 2016 रोजी रेड कॉर्नर नोटीस ( Red Corner Notice ) जारी करण्यात आलेली होती. नोटीसची मुदत 19 डिसेंबर, 2021 पर्यंत वैध होती. सुरेश पुजारीला फिलिपाईन्समध्ये दोन महिने अटकवून ठेवण्यात आले होते. दिल्लीच्या एका विमानतळावरून एटीएस पथकाने गुप्तचरविभागाकडून ( Intelligence Bureau ) पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले. दिल्लीहून व्यावसायिक विमानाने मुंबईत आणून बुधवारी (दि. 15) दुपारी ठाणे न्यायालयात हजर केले. सुरेश पुजारीकडून दोन आंतरराष्ट्रीय सिमकार्ड जप्त करण्यात आले आहे.

  • वेटर ते अंडरवर्ल्ड खंडणीखोर डॉन पुजारीचा प्रवास

सुरेश पुजारी हा 1995 साली उल्हासनगर परिसरातील डायमंड बार आणि ढाब्यावर वेटरचे काम करत होता. त्याने ठाणे शहराव्यतिरिक्त, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, कल्याण आणि उल्हासनगरसह नवी मुंबईच्या विविध भागातीन अनेकांना त्याने खंडणीसाठी धमकावण्यास सुरू केले. एकेकाळी रवी पुजारीसोबत ( Gangster Ravi Pujari ) खंडणी उकळण्याचा धंदा करणाऱ्या सुरेश पुजारीच्या गुन्हेगारीच्या वाटेवरील पहिली हत्या करण्याचा प्रयत्न विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत केला. या घटनेनंतर अंडरवर्ल्डमध्ये एन्ट्री सुरेश पुजारीने केली. त्यानंतर रवी पुजारीपासून अलिप्त होऊन स्वतःचे शार्पशूटर आणि नेटवर्क उभे करून खंडणी वसुली स्वतः सुरेश पुजारीने सुरू केली. बांधकाम व्यावसायिक, व्यापारी आदींच्या मागे लाखो आणि कोट्यवधींच्या खंडणीचा ससेमिरा सुरेश पुजारीने लावला. नकार देणाऱ्यांना ठार मारण्याची धमकी किंवा हस्तकांकडून गोळीबार करणे किंवा हत्या घडवून आणण्याचे गुन्हे सुरेश पुजारीवर दाखल आहेत.

  • 25 पेट्या टाक नाहीतर ढगात पाठवीन, अशा धमक्या द्यायचा

दोन वर्षांपूर्वीच कल्याण पश्चिमेकडील गांधारी माधव संकल्पच्या मागील बाजूस असलेल्या काशीष पार्कमध्ये राहणारे भास्कर शेट्टी या कॅन्टीन व्यावसायिकाला गँगस्टर पुजारीने धमकावले होते. शेट्टी यांना फोन करणाऱ्याने आपण सुरेश पुजारी बोलत असल्याची ओळख दिली. बऱ्या बोलाने 25 पेट्या टाक, नाहीतर ढगात पाठवीन, अशी जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी केली. या प्रकारामुळे शेट्टी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन खडकपाडा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

  • राजकीय नेत्यांनाही खंडणीसाठी धमक्या

कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारीने अनेक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी वसूल केली. एवढेच नाही तर सुरेश पुजारी खंडणीची रक्कम दे नाहीतर ढगात पाठवीन, तू मला ओळखत नाहीस पण मी तुला ओळखतो, अशा धमक्या देऊन ते खंडणी मागायाचा. त्याने उल्हासनगरमध्ये खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर केबल व्यावसायिक सच्चानंद करीरा याची हस्तकाकरवी हत्या घडवून आणली. त्यानंतर त्याने उल्हासनगरच्या एका माजी आमदारपुत्राला फोनवर धमकी दिली होती. राष्ट्रवादी व भाजप आमदारांकडेही खंडणीची मागणी करत धमकी दिल्याच्या तक्रारी असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे.

  • पुजारीच्या गुन्हेगारीची पार्श्वभूमी
  1. 1993 साली विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न
  2. 1995 च्या दरम्यान उल्हासनगर परिसरातील डायमंड बारमध्ये आणि ढाब्यावर वेटरचे काम केले.
  3. 1998 साली अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी दोन गुन्ह्यात सुरेश पुजारीला अटक केली होती.
  4. 2002 मध्ये दरोड्याच्या प्रकरणात सुरेश पुजारील मुंबईच्या डी. एन. नगर पोलिसांनी अटक केली होती.
  5. 2016 मध्ये सुरेश पुजारीने हस्तकाकरवी अंधेरीत एका व्यक्तीची हत्या केली होती.
  6. 2016 मध्ये केलेल्या गुन्ह्या प्रकरणी पाच गंभीर गुन्ह्यांची नोंद करून त्याला मकोका लावण्यात आला.

हे ही वाचा - कोरोनाची संधी साधून बोगस डॉक्टरने थाटला होता दवाखाना; बिंग फुटले अन...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.