ETV Bharat / state

धक्कादायक! अल्पवयीन पीडितेवर 33 नराधमांचा बलात्कार, व्हिडिओ क्लिप दाखवून केले कृत्य - लेटेस्ट बलात्कार न्यूज

एका अल्पवयीन मुलीचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. त्यातूनच प्रियकराने या मुलीचे आक्षेपार्ह चित्रीकरण केले होते. त्या चित्रीकरणाच्या आधारावर या तरुणीला ब्लॅकमेल करुन 33 जणांनी अत्याचार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Gang Physical Abused On Minor Girl In Thane District
ठाणे जिल्हा हादरला: अल्पवयीन तरुणीवर तब्बल 30 जणांचा बलात्कार
author img

By

Published : Sep 23, 2021, 1:33 PM IST

Updated : Sep 23, 2021, 5:40 PM IST

ठाणे : डोंबिवलीत सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे. भोपर परिसरात एका 15 वर्षी अल्पवयीन मुलीवर 33 नराधमांनी अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात 33 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आतापर्यत 23 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीमध्ये २ अल्पवयीन असल्याचे समोर आले असून अद्यापही 10 आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

अल्पवयीन पीडितेवर 33 नराधमांचा बलात्कार
सलग नऊ महिने केले अत्याचार
15 वर्षीय पीडित मुलगी मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. २२ जानेवारी २०२१ तिच्या प्रियकराने तिच्यावर अत्याचार केला. त्यावेळी त्याने अत्याचार करताना मोबाईलमध्ये चित्रीकरण केले होते. तेव्हापासूनच तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. आणि डोंबिवली, बदलापूर, मुरबाड व रबाळे या परिसरात आरोपींनी २२ सप्टेंबर २०२१ पर्यंत म्हणजे ९ महिन्यापर्यत तिच्यावर वारंवार बळजबरीने अत्याचार केला. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात बुधवारी रात्रीच्या सुमारास भादवि ३७६, ३७६ (एन), ३७६ (३) ३७६ (ड) (अ) सह पोक्सो कायदा कलम ४, ६१० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
2 बालकांचाही समावेश
कल्याण पोलीस परीमंडळ ३ मधील इतर पोलीस ठाणे तसेच मानपाडा पोलीस ठाण्यातील ४ पोलीस पथकांनी स्थापन गुन्हयातील आरोपीचे नाव व राहण्याचे ठिकाण शोधून काढले. आतापर्यत २३ आरोपीला ४ तासात ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. २३ जणांपैकी २ बालकांचाही या गुन्हयात सहभाग असल्याचे आढळून आली आहे. या गुन्ह्यातील उर्वरीत १० आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपींना अटक करण्याचे आम्ही प्रयत्न करत असल्याचे अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, यांनी सांगितले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस आयुक्त, प्रशासन आणि सोनाली ढोले करत आहेत.

साकीनाका परिसरात महिलेवर झाला बलात्कार, पीडितेचा झाला मृत्यू

मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. महिलेवर बलात्कार केल्यावर गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवी प्रकार समोर आला होता होता. साकीनाका परिसरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली होती. जखमी अवस्थेत महिलेला उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, मृत्यूशी तिची झुंज अपयशी ठरली होती. या घटनेवरुन संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने आरोपीला २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

हेही वाचा - संयुक्त किसान मोर्चाची 27 सप्टेंबरला 'भारत बंद'ची हाक, भाजप वगळता सर्व पक्षांचा बंदला पाठिंबा

Last Updated : Sep 23, 2021, 5:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.