नवी मुंबई - बनावट पॅनकार्ड, आधार कार्ड बनवून बँकेकडून लोन मंजूर करणारी टोळी अखेर एनआरआय पोलिसांनी गजाआड केली आहे. या टोळीमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे.
मागील काही दिवसांपासून नवी मुंबई मधील इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये जाऊन बनावट कागदपत्रांच्या माध्मयातून मोबाईल खरेदी करून आर्थिक फसवणूक केल्याचे प्रकार समोर येत होते. या प्रकरणातील आरोपी टोळके हे दुकानात जाऊन एचडीएफसी बँकेतून बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड वापरून सिबिल स्कोर चेक करायचे. त्यानंतर एचडीएफसी बँकेकडून लोन मंजूर करयाचे. मात्र घेतलेले कर्ज परत न करता या टोळक्याकडून फसवणूक केली जात होती. त्याबाबत एचडीएफसी बँकेचे अधिकारी रजीत कुरेशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून एनआरआय सागरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी गीता गुप्ता उर्फ पुनम जयस्वाल तोटो उर्फ नेहा कटियार उर्फ नेहा अन्सारी या पुण्यात राहणार्या महिलेला अटक करण्यात आली. गुन्ह्याचा तपासा दरम्यान अटक केलेला महिलेचा फोटो असलेले वीस आधार कार्ड वीस पॅन कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्यानंतर अटक महिलेकडे अधिकची चौकशी केली असता, तिने हा गुन्हा शोएब शेख अक्रम शेख, उर्फ दीपक कुमार यांच्या मदतीने करत असल्याचे सांगितले. या दोघांनाही पुण्यातून अटक केली आहे. तसेच आरोपी शोएब शब्बीर शेख याच्याकडून देखील नऊ बनावट पॅन कार्ड आधार कार्ड असे एकूण 58 आधार कार्ड पॅन कार्ड हस्तगत करण्यात आले आहेत.
बजाज फायनान्स मधील कर्ज धारकांच्या माहितीचा वापर-
या गुन्ह्यातील एक आरोपी बजाज फायनान्स मध्ये काम करत होता. त्याने बजाज फायनान्स मधून लोन घेणाऱ्या विविध लोकांचा डाटा चोरून बनावट आधार व पॅनकार्ड बनविल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.