ETV Bharat / state

Bhiwandi Crime : धक्कादायक! अल्पवयीन मोलकरीणवर मालकाचा जंगलात बलात्कार; आरोपी अटकेत

१४ वर्षीय अल्पवयीन मोलकरीणवर मालकाने जंगलात बळजबरीने बलात्कार (Physical Abused) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत आरोपी मालकाला पोलिसांच्या ताब्यात देऊन त्याला गजाआड केले आहे.

ganeshpuri police
गणेशपुरी पोलीस स्टेशन
author img

By

Published : Dec 15, 2021, 10:11 PM IST

ठाणे - एका १४ वर्षीय अल्पवयीन मोलकरीणवर मालकाने जंगलात बळजबरीने बलात्कार (Physical Abused) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी भिवंडी (Bhiwandi) तालुक्यातील गणेशपुरी पोलीस ठाण्यात (Ganeshpuri Police Station) श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत आरोपी मालकाला पोलिसांच्या ताब्यात देऊन त्याला गजाआड केले आहे. लडकू मुकणे असे अटक आरोपीचे नाव आहे.

  • ठार मारण्याची धमकी देऊन बलात्कार -

पीडित मुलीच्या वडिलांचे सहा वर्षांपूर्वी निधन झाले, तर तिची आईही एकटीला सोडून निघून गेली. त्यामुळे आईवडिलांचे छत्र हरवलेल्या पीडिताला भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या आरोपीने नातवंड आणि घराच्या बकऱ्या चरण्यासाठी तीला कामाला ठेवले होते. त्यातच मे महिन्यात पीडित मुलगी जंगलात बकऱ्या चारण्यासाठी गेली असता आरोपी मालकाने तिला ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जंगलात कोणी नसल्याचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केला. मात्र, जिवाच्या भीतीने पीडिता घाबरल्याचे पाहून आरोपी मालकाची हिंमत वाढली आणि त्यानंतर तिच्यावर वारंवार अत्याचार करीत होता.

  • आरोपीच्या पत्नीनेच फोडले नराधम नवऱ्याचे बिंग -

पीडित मालकाचा अत्याचार जिवाच्या भीतीने सहन करीत होती. त्यातच १३ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळच्या सुमारास पीडित मुलीवर आरोपी मालक राहत्या घरात अत्याचार करीत असल्याचे आरोपीच्या पत्नीने पाहिले असता तिला धक्काच बसला होता. त्यानंतर आरोपीच्या पत्नीने शेजारी राहणाऱ्या एका महिलेला पतीच्या कृत्यची हकीकत सांगितली. त्यानंतर श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते येथे पोहचले व तातडीने आरोपी लडकू यास पोलिसांच्या ताब्यात देऊन काल रात्री उशिरा अत्याचारासह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

  • नराधम मालकाच्या तावडीतून श्रमजीवी संघटनेने केली पीडितेची सुटका -

आरोपी मालकावर गुन्हा दाखल करतेवेळी श्रमजीवी संघटनेचे प्रमोद पवार, जया पारधी, नारायण जोशी, आशा भोईर, दुष्यंत घायवट ,जयेश पाटील, रुपेश जाधव, योगेश लोखंडे, वैशाली पाटील, संगीता भोईर इत्यादी कार्यकर्ते हजर होते. तर आज आरोपीला न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास गणेशपुरी पोलीस करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.