ठाणे : Ganesh Festival २०२३ : गणेश उत्सवाची अबालवृद्ध मोठ्या आतुरतेनं वाट पाहतात. गणेश उत्सवात (Ganesh Festival) बाप्पांच्या आगमनासोबतच भक्तांना गोडगोड मोदकांची आस लागते. ठाण्यातील सुप्रसिद्ध प्रशांत कॉर्नर मिठाईवाले खवय्यांच्या याच आवडीची विशेष काळजी (Ganesh Chaturthi २०२३) घेतात. अगदी पाचशे रुपयांपासून ते थेट दहा हजारापर्यंतच्या मोदकांना ठाणेकरांची विशेष पसंती मिळत आहे. त्यातच यावर्षी 'स्पेशल मोदक गिफ्टिंग आयडिया'नं तर सर्वांनाच चकित केलं आहे.
ठाण्यात मोदक महोत्सवाचं आयोजन : 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया'च्या जयघोषात आणि ढोलताशांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचं घरोघरी आगमन होणार आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी आबालवृद्ध उत्सुक झाले असून सुंदर मखरं देखील उभारली गेली आहेत. याच गणेशोत्सवाच्या आनंदाला द्विगुणित करतात ते गोडगोड मोदक. ठाण्यातील प्रशांत कॉर्नरची अप्रतिम मिठाई सणासुदीला सर्वांच्या पसंतीस उतरते. नेहमीप्रमाणे या गणेशोत्सवात प्रशांत कॉर्नरनं मोदक महोत्सवाचं आयोजन केलं आहे. आंबा, काजू, मावा तसेच सुकामेवा अशा विविध फ्लेवर्समध्ये हे मोदक मिळत असून खरेदीसाठी ठाणेकर गर्दी करत आहेत. कडक बुंदीचे लाडू देखील लहान साईजपासून पाच किलोच्या साईजमध्ये उपलब्ध आहेत.
मोदकासाठी केली जाणार आहे विशेष पॅकिंग : कडक बुंदीचे लाडू आता परत खवाय्यांना आवडू लागले आहेत, असेच दिसून येत आहे. प्रशांत कॉर्नरचे मोदक म्हणजे अप्रतिम कलाकृतीचा नमुनाच असून प्रत्येक मोदक बनवताना, कारागीर आपलं कसब पणाला लावताना दिसतात. मोदक तोंडात टाकण्यापूर्वी खवय्ये या मोदकांची कलाकृती पाहूनच थक्क होतात. प्रशांत कॉर्नरनं नेहमीप्रमाणं मोदक गिफ्टिंगसाठी अनोखं गिफ्ट पॅक विक्रीसाठी आणलं आहे. हे बॉक्स बघूनच ग्राहक आकर्षित होतात. तब्बल अडीच हजारापासून दहा हजारापर्यंत या बॉक्सच्या किमती असून ठाणेकर त्यांना विशेष पसंती देत असल्याची माहिती प्रशांत कॉर्नरच्या वतीनं देण्यात आली आहे.
हेही वाचा :