ठाणे - कोविड वॅक्सिनच्या दुसऱ्या डोसनंतर अंगावर भांडे चिकटत असल्याचा प्रयोग नाशिक येथील एका नागरिकाने केल्यावर हा चर्चेचा विषय ठरला असतानाच,आज चक्क उल्हासनगर महानगरपालिकेतील लिपिकाने हाच प्रयोग केल्यावर त्याचे अंग भांड्यांनी चिकटून गेले आहे. लिपिकानेच हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल केल्याने कोविडच्या दुसऱ्या डोसमध्ये लोहचुंबकचे प्रमाण अधिक प्रमाणात आहे का हा संशोधनाचा विषय बनला आहे.
लसीच्या दुसरा डोसनंतर अंगाला चिकटतात भांडी?उल्हासनगर महानगरपालिकेत लिपिक पदावर असणाऱ्या या मॅग्नेटिक मॅनचे नाव शांताराम चौधरी आहे. शांताराम यापूर्वी तत्कालीन मुख्यालय उपआयुक्त संतोष देहरकर यांच्याकडे लिपिक (स्वीयसहाय्य) होते. देहरकर यांची बदली झाल्यावर शांताराम हे प्रभाग समिती 1 मध्ये सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्याकडे लिपिक आहेत. शांताराम यांनी वॅक्सिनचा दुसरा डोस घेतलेला आहे. नाशिकच्या एका नागरिकाच्या शरीरावर दुसऱ्या डोस नंतर भांडे चिकटत असल्याचा प्रयोग बघून शांताराम चौधरी यांनीही प्रयोग केला. त्यानंतर, चौधरींचे शरीर चक्क स्टीलच्या भांड्यांनी चिकटून गेले.व्हायरल व्हिडिओ पाहून अधिकाऱ्यांचा फोन