ETV Bharat / state

चार वर्षांच्या मुलीचे बसमधून अपहरण... अत्याचार करून पोत्यातून फेकले - crime in thane

मीरा भाईंदरमध्ये एका चार वर्षांच्या मुलीचे बसमधून अपहरण केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने पीडित मुलीवर अत्याचार करून तिला पोत्यातून फेकून दिले. मात्र पोलिसांनी तपासाची सुत्रे गतीने फिरवून नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.

thane crime news
चार वर्षांच्या मुलीचे बसमधून अपहरण... अत्याचार करून पोत्यातून फेकले
author img

By

Published : Dec 21, 2020, 5:59 PM IST

Updated : Dec 21, 2020, 7:46 PM IST

ठाणे - मीरा भाईंदरमध्ये एका चार वर्षांच्या मुलीचे बसमधून अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने पीडित मुलीवर अत्याचार करून तिला पोत्यातून फेकून दिले. मात्र पोलिसांनी तपासाची सुत्रे गतीने फिरवून नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.

चार वर्षांच्या मुलीचे बसमधून अपहरण... अत्याचार करून पोत्यातून फेकले

भाईंदर पश्चिममध्ये चार वर्षांच्या मुलीचे अपहरण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. यानंतर आरोपीने वसई वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत या मुलीला गोणीत बांधून फेकले. मुलीच्या कुटुंबातील सदस्यांच्या तक्रारीवरून भाईंदर पोलिसांनी चार तासात संबंधित बस चालकाला वसईतून अटक केली आहे. या घटनेत चिमुकलीचा जीव वाचला असून पुढील उपचारासाठी तिला मुंबईतील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी मुलीचे अपहरण झाले होते. यानंतर कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली होती.

पोत्यात घालून रस्त्याच्या कडेला फेकले

भाईंदर पश्चिम येथील भोला नगर झोपडपट्टीतील लहान मुलं रविवारी दुपारी एकच्या सुमारास घरा समोर उभ्या असलेल्या लक्झरी बसमध्ये खेळत होती. यानंतर बस निघून गेली. यावेळी सर्वजण बसमधून खाली उतरले. मात्र चार वर्षांची चिमुकली गायब असल्याने तिच्या पालकांनी पोलीस ठाणे गाठले. यानंतर पोलिसांनी बस चालकाचा शोध लावला. यावेळी आरोपी बसचालक वसई माणिकपूर येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शिताफीने आरोपीला अटक केल्यानंतर धक्कादायक खुलासा झाला. बसमध्येच लैंगिक अत्याचार करून चार वर्षाच्या चिमुकलीचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले. तसेच प्लास्टिकच्या पोत्यात भरून वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला तिला फेकण्यात आले. वालीव पोलिसांनी ही चिमुकली जखमी अवस्थेत आढळून आली. तात्काळ प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी तिला मुंबईतील नायर रुग्णालयात दाखल केलं आहे.

आरोपीला 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

आरोपीला न्यायालयात हजार केल्यानंतर त्याला 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती मीरा-भाईंदरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत भोसले सांगितले.

Last Updated : Dec 21, 2020, 7:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.