ETV Bharat / state

Thane Crime: तलवारीने केक कापणे पडले महागात; बर्थ डे बॉय पोलिसांच्या ताब्यात

Thane Crime: ठाणे शहरात वाढदिवसाचा केक तलवारीने कापत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे ठाणे पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे.

Thane Crime
Thane Crime
author img

By

Published : Dec 6, 2022, 1:00 PM IST

ठाणे: महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात एका कार्यक्रमाच्या दरम्यान तलवारी चालवल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी 2 बांधकाम व्यावसायिकांसह 4 जणांना अटक केली आहे, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने आज दिली आहे. 3 डिसेंबर रोजी सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

गुन्ह्यांची नोंद: ज्यामध्ये एक व्यक्ती तलवारीने वाढदिवसाचा केक कापताना आणि इतर 3 जण शस्त्रे घेऊन दिसले आहे. शहर पोलिसांनी अधिकृत प्रकाशनात म्हटले आहे. त्यानंतर शिळ-डायघर पोलिसांनी त्याचा तपास केला आहे. आणि शस्त्र कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित तरतुदींनुसार 3 वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

अधिकचा तपास पोलिसांकडे: पोलिसांच्या तपास पथकाने विविध माहितीवर काम केले आणि सोमवारी 4 जणांना तलवारी बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये ३५ आणि ४० वयोगटातील दोन बांधकाम व्यावसायिक, तर ३८ वर्षीय ऑटो-रिक्षा चालक आणि २३ वर्षीय स्थानिक रहिवासी यांचा समावेश आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलिस करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.