ETV Bharat / state

भिवंडीत चार मजली इमारत पत्याच्या बंगल्यासारखी कोसळली; दोघांचा मृत्यू, पाच जखमी - Thane

अनधिकृत इमारतींचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी महापालिका क्षेत्रातील गैबी नगर पिरणी पाडा परिसरातील 4 मजली अनधिकृत मुन्नवर इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेनंतर तब्बल तीन तासाने अग्रिशामक पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मदत कार्य सुरू झाले. म्हणून नागरिकांनी महापालिका प्रशासन विरोधात रोष व्यक्त केला आहे.

भिवंडीत चार मजली 'अनधिकृत'  इमारत पत्यासारखी कोसळली
author img

By

Published : Aug 24, 2019, 9:46 PM IST

Updated : Aug 24, 2019, 11:26 PM IST

ठाणे - अनधिकृत इमारतींचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी महापालिका क्षेत्रातील गैबी नगर पिरणी पाडा परिसरातील 4 मजली अनधिकृत मुन्नवर इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत. अहमद अन्वर अली (वय 25) आणि मोहम्मद मोहम्मद हबीब शेख (वय 27) अशी मृतांची नावे आहेत. विशेष बाब म्हणजे, काही तासाआधीच इमारतीला तडे गेल्याने नागरिकांनी लक्षात आणून दिले होते. यानंतर या इमारतीमधील तब्बल बावीस कुटुंबांना घराबाहेर हलवण्यात आले होते आणि यानंतर अवघ्या एका तासातच इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. मात्र, सुदैवाने सर्व 22 कुटुंब घराबाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली.

भिवंडीत चार मजली अनधिकृत इमारत पत्यासारखी कोसळली; दोघांचा मृत्यू, पाच जखमी

तर या दुर्घटनेतील दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अनधिकृत इमारत उभारणाऱ्या मालकाला शांती नगर पोलिसांनी केली अटक केली आहे. मुन्नवर अली अन्सारी (वय 39) असे अनधिकृत 4 मजली इमारत उभारणाऱ्या भूमाफियाचे नाव आहे. आज(शनिवारी) त्याला न्यायालयात हजर केले असता 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर अधिक तपास शांती नगर पोलीस करीत आहेत,

या दुर्घटनेनंतर तब्बल तीन तासाने अग्नीशामक पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मदत कार्य सुरू झाले. तोपर्यंत स्थानिक तरुणांनी तीन जणांना सुखरूप बाहेर काढले होते. मात्र, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला होता. या घटनेदरम्यान कोणतीही यंत्रसामग्री नसल्याने व त्याबाबतचे कुशल ज्ञान नसल्याने आपत्कालीन कक्षाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. याविषयी नागरिकांनी महापालिका प्रशासन विरोधात रोष व्यक्त केला आहे.

'मुन्नवर बिल्डिंग' या नावाने ओळखली जाणारी ही इमारत 8 ते 10 वर्षींपूर्वीच निकृष्ट दर्जाच्या बांधकाम साहित्याने उभारल्याचे दिसून आले आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रातील शांतीनगर मार्गावरील पिरानी पाडा येथे अत्यंत दाटीवाटीच्या ठिकाणी दहा वर्षांपूर्वी मुन्नवर अन्सारी या भूमाफियांनी अनधिकृतपणे ही चार मजली इमारत उभारली होती. या इमारतीमध्ये एकूण बावीस कुटुंब वास्तव्यास होती. अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरून बांधकाम केल्याने 23 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या खालील बाजूस तडे गेल्याचे नागरिकांच्या लक्षात आले असताना त्यांनी याबाबत महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाला कळविले होते.

घटनेनंतर, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तर आपत्कालीन विभाग प्रमुख ईश्वर आडेप यांनी परिस्थिती पाहता आयुक्त अशोक कुमार रणखांब यांना फोनद्वारे घटनेची माहिती दिली. आयुक्तांनी मध्यरात्री घटनास्थळी दाखल होऊन स्थानिक शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलिसांना पाचारण केले आणि तत्काळ सर्व कुटुंबीयांना घरे खाली करण्याचे आव्हान केले. त्यांनतर शहरातील तज्ञ अभियंते जावेद आजमी यांच्यामार्फत इमारतीची पाहणी केली आणि ही इमारत कधीही कोसळू शकते, असे त्यांनी सांगितले यानंतर सर्व कुटुंबीयांनी मध्यरात्रीच्या सुमारास इमारत रिकामी केली.

मात्र, काही रहिवासी आपल्या घरातील मौल्यवान वस्तू आणण्यासाठी गेले होते. त्यांना पोलीस व मनपा आपत्कालीन कक्षातील कर्मचारी बाहेर काढत असतांना पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे आवाज करीत इमारत कोसळली. या घटनेने परिसरात एकच गोंधळ उडाला. या दुर्घटनेत आपत्कालीन कक्षातील जवान, पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवानही किरकोळ जखमी झाले आहेत. अब्दुल अजित सय्यद (वय 65), जावेद कमृद्दिन शेख (वय 40), नियाज मोहम्मद अली सिद्दिकी (वय 45) आणि सुपियाब अब्दुल अन्सारी (वय 23) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर आयजीएम आणि नोबेल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चौथ्या मजल्यावरुन दुचाकी खाली आणणे तरुणाच्या जीवावर बेतले -

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेला अकिब मोहम्मद हबीब शेख हा आपल्या भावाची दुचाकी चौथ्या मजल्यावर आणण्यासाठी इमारतीमध्ये शिरला होता. मात्र, चौथ्या मजल्यावरील दुचाकी खाली घेऊन येत असतानाच इमारत कोसळली आणि अकिबचा मलब्या खाली दबून मृत्यू झाला.

Intro:किट नंबर 319

Body:अपडेट ) अनधिकृत चार मजली मुन्नवर इमारत पत्यासारखी कोसळली ; 2 ठार तर 6 जखमी,

ठाणे : अनधिकृत इमारतींचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी महापालिका क्षेत्रातील गैबी नगर पिरणी पाडा परिसरातील 4 मजली अनधिकृत इमारत कोसळून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे, विशेष बाब म्हणजे काही तासाआधीच इमारतीला तडे गेल्याने नागरिकांनी लक्षात आणून दिल्याने या इमारतीमधील तब्बल बावीस कुटुंबांना घराबाहेर हलवल्यानंतर अवघ्या एक तासातच मुन्नवर नावाची इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली होती मात्र सर्व 22 कुटुंब घराबाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली, तर घरातील साहित्य घेण्यासाठी गेलेले सहा जण या ठिकाणी खाली अडकले होते या दुर्घटनेनंतर तब्बल तीन तासाने पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मदत कार्य सुरू झाले , तोपर्यंत स्थानिक तरुणांनी तीन जणांना सुखरूप बाहेर काढले, मात्र त्यापैकी एकाचा मृत्यू झाला होता या घटने दरम्यान कोणतीही यंत्रसामुग्री नसल्याने व त्याबाबतचे कुशल ज्ञान नसल्याने आपत्कालीन कक्षाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या असून त्यामुळे नागरिकांनी महापालिका प्रशासन विरोधात आपला रोष व्यक्त केला आहे,
मुन्नवर बिल्डिंग या नावाने ओळखली जाणारी ही इमारत होती, 8 ते 10 वर्षी पूर्वीच नित्कृष्ट दर्जाच्या बांधकाम साहित्याने इमारत उभारल्याचे दिसून आले आहे तर या दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अहमद अन्वर अली वय 25 मोहम्मद मोहम्मद हबीब शेख वय 27 असे ढिगाऱ्याखाली सापडून मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची नावे आहे,
भिवंडी महापालिका क्षेत्रातील शांतीनगर मार्गावरील पिरानी पाडा येथे अत्यंत दाटीवाटीच्या ठिकाणी दहा वर्षांपूर्वी मुन्नवर अन्सारी या भूमाफियांनी अनधिकृतपणे ही चार मजली इमारत उभारली असून या इमारतीमध्ये एकूण बावीस कुटुंब वास्तव्यास होती, अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरून बांधकाम केल्याने या इमारतीला 23 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या खालील बाजूस तडे गेल्याचे नागरिकांच्या लक्षात आले असताना त्यांनी याबाबत महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाला कळविले, त्यांनतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले तर आपत्कालीन विभाग प्रमुख ईश्वर आडेप यांनी परिस्थिती पाहता आयुक्त अशोक कुमार रणखांब यांना फोन द्वारे घटनेची माहिती दिली, आयुक्तांनी मध्य रात्री घटनास्थळी दाखल होऊन स्थानिक शांती नगर पोलिस ठाण्यातील पोलिसांना पाचारण करून तत्काळ सर्व कुटुंबियांना घरे खाली करण्याचे आव्हान केले, त्यांनतर शहरातील तज्ञ अभियंते जावेद आजमी यांच्यामार्फत इमारतीची पाहणी करून ही इमारत कधीही कोसळू शकते असे त्यांनी सांगितल्यानंतर सर्व कुटुंबीयांनी मध्यरात्रीच्या सुमारास ही इमारत रिकामी केली मात्र काही रहिवासी आपल्या घरातील मौल्यवान वस्तू आणण्यासाठी गेले असता त्यांना पोलीस व मनपा आपत्कालीन कक्षातील कर्मचारी बाहेर काढत असतांना इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे आवाज करीत ही इमारत कोसळली त्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला या दुर्घटनेत आपत्कालीन कक्षातील जवान पोलिस कर्मचारीही आणि अग्निशमन दलाचे जवान ही किरकोळ जखमी झाले आहेत, या दुर्घटनेत इमारतीत राहणारे रहिवाशी अब्दुल अजित सय्यद वय 65 जावेद कमृद्दिन शेख वय 40 नियाज मोहम्मद अली सिद्दिकी वय 45 आणि सुपियाब अब्दुल अन्सारी वय 23 अशी जखमी झालेल्या रहिवाशांची नावे असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे,

या घटनेची माहिती मिळताच आयुक्त अशोक कुमार रणखांब, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे , तहसिलदार शशिकांत गायकवाड यांच्यासह एनडीआरएफ व ठाणे महापालिकेची टी डी आर एफ पथक घटनास्थळी तीन तासानंतर दाखल होऊन मदत कार्यास गती आली होती, आयुक्त रणखांब यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की अत्यंत दुर्दैवी दुर्घटना असून जर वेळेतच ही इमारत महापालिका प्रशासनाने रिकामी केली नसती तर अधिक मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली असती असे सांगत सदरची इमारत अनधिकृत असून त्याबाबत जो कोणी पालिका अधिकारी जबाबदार असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करीत ही इमारत उभी करणारा मालक व बांधकाम ठेकेदार यांच्यावरही शांती नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सांगितले

चौथ्या मजल्यावरून दुचाकी खाली आणणे तरुणाच्या जीवावर बेतले
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेला अकिब मोहम्मद हबीब शेख हा आपल्या भावाची दुचाकी चौथ्या मजल्यावर आणण्यासाठी इमारतीमध्ये शिरला होता मात्र चौथ्या मजल्यावरील दुचाकी खाली घेऊन येत असतानाच इमारत कोसळली आणि अकिब मलब्या खाली दबून त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,
ftp fid ( 4 bayet, 3 vis)
mh_tha_2_ bhiwandi_binding _collapse_4_bayet_3_vis_mh_10007

Conclusion:
Last Updated : Aug 24, 2019, 11:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.