ETV Bharat / state

ऑफरमध्ये महिंद्रा कार लागल्याचे भासवून तरुणाची फसवणूक - ठाणे गुन्हे बातमी

इंद्रकुमार सोपान देगांवकर ( 20 रा. कोनगांव ) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. फसवणूक झालेल्या इंद्रकुमार याला संजय शर्मा नावाच्या भामट्याकडून मोबाईलवर 1 नोव्हेंबर रोजी मेसेज आला होता. त्यामध्ये तुम्हाला महिंद्रा व्हीएक्सवाय- 500 ही कार दिवाळी धमाका ऑफरमध्ये लागली आहे. असा बनाव करून जर गाडी नको असेल तर 14 लाख 84 हजार रुपयांची रोख रक्कम मिळेल. मात्र, त्यासाठी सर्वप्रथम कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी 15 हजार 500 रुपये बँक अकाऊंटमध्ये भरावे लागतील, असे सांगितले.

ऑफरमध्ये महिंद्रा कार लागल्याचे भासवून तरुणाची फसवणूक
author img

By

Published : Nov 8, 2019, 5:34 PM IST

ठाणे - मोबाईलवर महिंद्रा व्हीएक्सवाय- 500 ही कार दिवाळी धमाका ऑफरमध्ये लागली आहे, असे सांगून एका तरूणाची साडेचार लाखांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. एका तरुणाला मोबाईलवर महिंद्रा व्हीएक्सवाय- 500 ही कार दिवाळी धमाका ऑफरमध्ये लागली आहे, मेसेज आला असता त्यास तरुणाने प्रतिसाद दिला नाही. मात्र, त्यानंतर भामट्याने तरुणाचा विश्वास संपादन करून तुम्हांला गाडी नको असेल तर 14 लाख 84 हजार रुपये मिळतील, असे आमिष दाखवून त्यासाठी 4 लाख 45 हजार 800 रुपयांची रोकड फोन पे ऍपद्वारे घेऊन तरुणाची फसवणूक केली. ही घटना कोनगांव, जांभुळवाडी येथे घडली.

ऑफरमध्ये महिंद्रा कार लागल्याचे भासवून तरुणाची फसवणूक

हेही वाचा - उल्हासनगरात फर्निचरच्या दुकानाला भीषण आग; लाखोंचे फर्निचर जळून खाक

इंद्रकुमार सोपान देगांवकर ( 20 रा. कोनगांव ) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. फसवणूक झालेल्या इंद्रकुमार याला संजय शर्मा नांवाच्या भामट्याकडून मोबाईलवर 1 नोव्हेंबर रोजी मेसेज आला होता. त्यामध्ये तुम्हाला महिंद्रा व्हीएक्सवाय- 500 ही कार दिवाळी धमाका ऑफरमध्ये लागली आहे. असा बनाव करून जर गाडी नको असेल तर 14 लाख 84 हजार रुपयांची रोख रक्कम मिळेल. मात्र, त्यासाठी सर्वप्रथम कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी 15 हजार 500 रुपये बँक अकाऊंटमध्ये भरावे लागतील, असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून इंद्रकुमार याने फोन पे ऍपद्वारे सदरचे पैसे भरले. मात्र, त्यानंतर आणखी 3 लाख 68 हजार आणि 10 हजार तसेच वडिलांच्या बँक खात्यातून 62 हजार 300 रुपये असे एकूण 4 लाख 45 हजार 800 रुपयांची रोकड भरण्यात आली. मात्र, काही दिवस उलटून गेले तरी देखील आपल्या बँक खात्यावर 14 लाख 84 हजार रुपयांची रक्कम जमा होत नाही. त्यावेळी इंद्रकुमार याने मेसेज आणि संपर्क करण्यात आलेल्या भामट्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा - कल्याणमध्ये आढळला दुर्मिळ 'रानकस्तूर' पक्षी; पक्षीमित्राने दिले जीवदान

त्यावेळी सदरचा मोबाईल बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच इंद्रकुमार याने कोनगाव पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार कथन केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ संजय शर्मा नांवाच्या भामट्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जीवन शेरखाने करत आहेत.

Intro:kit 319Body:दिवाळी धमाका ऑफरमध्ये महेंद्रा कार लागल्याचे भासवून तरुणाची साडेचार लाखांची फसवणूक

ठाणे : मोबाईलवर महेंद्रा व्हीएक्सवाय - ५०० हि कार दिवाळी धमाका ऑफरमध्ये लागली आहे असा मॅसेज आला असता त्यास तरुणाने प्रतिसाद दिला नाही. मात्र त्यानंतर भामट्याने तरुणाचा विश्वास संपादन करून तुम्हांला गाडी नको असेल तर १४ लाख ८४ हजार रुपये मिळतील असे अमिश दाखवून त्यासाठी ४ लाख ४५ हजार ८०० रुपयांची रोकड फोन पे ऍपद्वारे आगाऊ घेऊन तरुणाची फसवणूक केल्याची घटना कोनगांव ,जांभुळवाडी येथे उघडकीस आली आहे. इंद्रकुमार सोपान देगांवकर ( २० रा. कोनगांव ) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नांव आहे.

फसवणूक झालेल्या इंद्रकुमार याला संजय शर्मा नांवाच्या भामट्याकडून मोबाईलवर १ नोव्हेंबर रोजी मॅसेज आला होता. त्यामध्ये तुम्हांला महेंद्रा व्हीएक्सवाय - ५०० हि कार दिवाळी धमाका ऑफरमध्ये लागली आहे.असा बनाव करून जर गाडी नको असेल तर १४ लाख ८४ हजार रुपयांची रोख रक्कम मिळेल. मात्र त्यासाठी सर्वप्रथम कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी १५ हजार ५०० रुपये बँक अकाउंटमध्ये भरावे लागतील असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून इंद्रकुमार याने फोन पे ऍपद्वारे सदरचे पैसे भरले. मात्र त्यानंतर आणखीन ३ लाख ६८ हजार आणि १० हजार तसेच वडिलांच्या बँक खात्यातून ६२ हजार ३०० रुपये असे एकूण ४ लाख ४५ हजार ८०० रुपयांची रोकड भरण्यात आली. मात्र काही दिवस उलटून गेले तरी देखील आपल्या बँक खात्यावर १४ लाख ८४ हजार रुपयांची रक्कम जमा होत नाही.

इंद्रकुमार याने मॅसेज आणि संपर्क करण्यात आलेल्या भामट्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सदरचा मोबाईल बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच इंद्रकुमार याने कोनगांव पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार कथन केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ संजय शर्मा नांवाच्या भामट्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जीवन शेरखाने करीत आहे.

Conclusion:fasvnuk
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.