ETV Bharat / state

माजी महापौरांसह, भाजप नगरसेवकाची राष्ट्रवादीत घरवापसी

मीरा भाईंदरच्या माजी महापौर निर्मला सावळे यांसह भाजप नगरसेवक आसिफ शेख यांनी आपल्या समर्थकांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी
राष्ट्रवादी
author img

By

Published : Jan 20, 2021, 7:00 PM IST

Updated : Jan 20, 2021, 7:42 PM IST

मीरा भाईंदर (ठाणे) - मीरा भाईंदरच्या माजी महापौर निर्मला सावळे यांसह भाजप नगरसेवक आसिफ शेख यांनी आपल्या समर्थकांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यात आला. शहरातील भाजप-सेनेतील अनेक नाराज राष्ट्रवादीची वाट धरणार असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे.

दोघांची घरवापसी

मीरा भाईंदर शहराच्या माजी महापौर निर्मला सावळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सध्या त्या काँग्रेस पक्षात कार्यरत होत्या. काँग्रेसमध्ये जाण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होत्या. सध्या ते कोणत्याही पदावर नाहीत. भाजप नगरसेवक आसिफ शेख हे देखील पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक होते. मात्र, २०१७ च्या निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. सध्या ते भाजपचे नगरसेवक आहेत. दोघांच्या प्रवेशामुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत.

...म्हणून इनकमिंग सुरू

महाराष्ट्रात तीन पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपमध्ये गेलेले अनेक दिग्गज पुन्हा स्वगृही परततत आहेत. 2014 च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये जाणे पसंद केले. मात्र, राज्यात अचानक घडलेल्या सत्ता स्थापनेनंतर पुन्हा स्वगृही जाणे पसंद करत आहे. याचे परीणाम स्थानिक पातळीवर पाहायला मिळत आहेत. मीरा भाईंदर शहरात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नगरसेवक नाही. मात्र, ज्या पद्धतीने इनकमिंग सुरू आहे त्यानुसार येणाऱ्या 2022 महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना असे समीकरण झाले तर सत्ता परिवर्तन देखील होऊ शकते.

Last Updated : Jan 20, 2021, 7:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.