ETV Bharat / state

KDMC: कल्याण-डोंबिवलीत बेकायदा बांधकाम घोटाळ्यात आणखी पाच बांधकाम व्यावसायिकांना अटक - कल्याण डोंबिवली महानगरपालिका

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) व महारेरा (MAHARERA) कार्यालयाच्या बनावट परवानगीचा वापर करून अनधिकृत बांधकाम (illegal construction) करणाऱ्या आणखी ५ बांधकाम व्यावसायिकांना आज अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आजवर 10 जणांना अटक झाली आहे.

KDMC
कल्याण-डोंबिवलीत बेकायदा बांधकाम घोटाळ्यात आणखी पाच बांधकाम व्यावसायिकांना अटक
author img

By

Published : Nov 23, 2022, 9:31 PM IST

ठाणे: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) व महारेरा कार्यालयाच्या (MAHARERA) बनावट परवानगीचा वापर करून अनाधिकृत बांधकाम (illegal construction) करणाऱ्या आणखी ५ बांधकाम व्यावसायिकांना आज अटक करण्यात आली आहे. कल्याण ग्रामिण परिसरात केडीएमसी व महारेरा कार्यालयाच्या बनावट परवानगी विक्री करून घर घेणाऱ्या सर्वसामान्य नागरिक व शासनाची या अटक आरोपींकडून फसवणूक करण्यात येत असून याप्रकरणात आतापर्यत ६५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी १० जणांना आतापर्यंत अटक केली आहे. मुकुंद मिलिंद दातार, सुनील बाळाराम मढवी, रजत राजन, आशु लक्ष्मण मुंगेश, राजेश रघुनाथ पाटील अशी अटक केलेल्या बांधकाम व्यावसायिकांची नावे आहेत.

डोंबिवलीतील ६५ भूमाफियांच्या विरुध्द गुन्हे: काही दिवसांपूर्वी या प्रकरणात पाच मध्यस्थांना अटक झाली आहे. या अटकेने आता आरोपींची संख्या १० झाली आहे. मागील दोन महिन्यात डोंबिवलीतील ६५ भूमाफियांच्या विरुध्द वास्तुविशारद याचिकाकर्ते संदीप पाटील (Architect Petitioner Sandeep Patil) यांच्या तक्रारीवरुन पालिकेने मानपाडा, रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले. या गुन्ह्यांची व्याप्ती पाहून ठाणे पोलीस आयुक्तांनी विशेष तपास पथक स्थापन केले. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाच जणांचे तपास पथक या बेकायदा बांधकाम प्रकरणाची चौकशी गेल्या दोन महिन्यांपासून करत आहे. ६५ हून अधिक भूमाफिया, वास्तुविशारद, मध्यस्थ यांचे जबाब तपास पथकाने नोंदून घेतले आहेत. या माहितीवरुन तपास पथकाने बांधकामांची बनावट कागदपत्रे तयार करणारे, रेरा प्रमाणपत्र मिळवून देणारे डोंबिवलीतील प्रियांका रावराणे, प्रवीण ताम्हणकर, राहुल नवसागरे, जयदीप त्रिभुवन, कैलास गावडे या मध्यस्थांना यापूर्वी अटक केली आहे. ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

याचिकाकर्ते संरक्षण मिळत नसल्याने नाराज: जबाब नोंदवुन घेऊन, मध्यस्थांना अटक करुनही माफियांना अटक होत नसल्याने तपास पथकाविषयी शंका उपस्थित केल्या जात होत्या. जबाब नोंदवून आलेले माफिया, वास्तुविशारद तपास पथकाविषयी बाहेर संभ्रमाचे वातावरण निर्माण करत होते. माफियांपासून जीविताला धोका निर्माण झाला आहे म्हणून तक्रारदार पाटील पोलिसांकडे गेल्या महिन्यांपासून पोलीस संरक्षणाची मागणी करत आहेत. संरक्षण मिळत नसल्याने नाराज झालेल्या याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी सोमवारी कल्याण जिल्हा न्यायालयात न्यायालयासमोर जबाब नोंदविला आहे. आपल्या जीविताला येत्या काळात काहीही होऊ शकते. यापुढे शेवटच्या जबाबासाठी राहू की नाही याची मला शाश्वती नसल्याने आपण जबाब देत आहोत, अशी माहिती न्यायालयासमोर दिली.

ईडीकडून पालिका अधिकाऱ्यांची चौकशी: (Enforcment Department) ईडीने दोन दिवस पाटील यांच्या बरोबर पालिका अधिकाऱ्यांची चौकशी केली. ईडीकडून कोणत्याही क्षणी माफियांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली असताना, बुधवारी सकाळी गुन्हे विभागाच्या तपास पथकाने डोंबिवलीतील पाच माफियांना अटक केली. यामध्ये बनावट इमारत बांधकाम कागदपत्र, सही शिक्के तयार करणाऱ्या माफियांचा समावेश आहे. मध्यस्थांच्या माहितीवरुन पथकाने ही कारवाई केली असल्याचे कळते. डोंबिवलीतील एक आरोपी वास्तुविशारद पथकातील अधिकारी वर्गमित्र आहेत असे सांगून पथकाविषयी शहरात संभ्रमाचे वातावरण निर्माण करत आहे. पालिका निवडणुकीनंतर हे प्रकरण शांत होईल असा दिलासा राजकीय मंडळी माफियांना देत आहेत.

मागील दोन महिन्यांपासून गाजत असलेल्या डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारत प्रकरणाशी संबंधित डोंबिवली, २७ गावातील पाच बांधकाम विकासकांना बुधवारी सकाळी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने अटक केली. या कारवाईने भूमाफियांमध्ये खळबळ उडाली असून बहुतांशी भूमाफिया अटकेची कारवाई टाळण्यासाठी मुरबाड, शहापूर, सांगली, सातारा भागातील आपल्या शेतघरात लपून बसले असल्याचे विश्वसनीय सुत्राने सांगितले. या माफियांनी सामान्य लोकांना बेकायदा इमारतीत घर विकून फसवणूक केली आहे. शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडविला आहे. बँकांची कर्जाच्या माध्यमातून फसवणूक केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.