ETV Bharat / state

चिमुकल्याचे अपहरण करून 70 हजाराला सौदा; पोलिसांनी 'असा' शोध घेत केली 5 जणांना अटक - ठाणे जिल्ह्यातील बातम्या

ठाण्यात घरासमोर खेळत असणाऱ्या अडीच वर्षीय चिमुकल्याचे अपरहरण करून त्याचा 70 हजार रुपयाला सौदा करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला अंबरनाथ पोलिसांनी अटक केली आहे.

Five Arrested For Kidnapping And Selling 2.5 year old in thane
चिमुकल्याचे अपहरण करून 70 हजाराला सौदा; पोलिसांनी 'असा' शोध घेत केली ५ जणांना अटक
author img

By

Published : Sep 28, 2020, 7:45 AM IST

ठाणे (अंबरनाथ) - घरासमोर खेळत असणाऱ्या अडीच वर्षीय चिमुकल्याचे अपरहरण करून त्याचा 70 हजार रुपयाला सौदा करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला अंबरनाथ पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींच्या तावडीतून त्या चिमुकल्याची सुखरूपपणे सुटका करून त्याला त्याच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केले आहे. विशेष 5 आरोपी पैकी 3 महिलांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल असून पूजा शेट्टीयार ( वय 28) जयनबी खान (वय 33) शेरू सरोज (वय 45) मुकेश खारवा (वय 36) माया काळे (वय 30) असे अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ पश्चिम रेल्वे स्टेशन लगत भाजी मार्केट येथे सर्कल ग्राउंड जवळ राहणारी लिलिया मंडल या महिलेचा अडीच वर्षीय मुलगा विकास हा 15 सप्टेंबर रोजी दुपारी घरासमोर त्यांच्या भावंडांसोबत खेळत होता. तो अचानक घरासमोरून बेपत्ता झाला. तेव्हा त्याचा सर्वत्र शोध घेऊन तो न सापडल्याने अखेर लिलीया मंडल यांनी अमरनाथ पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपला मुलगा विकास याला कोणी तरी पळवून नेले असल्याची तक्रार दाखल केली होती. यावर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यावेळी नेरळ येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने तो मुलगा नेरळमध्ये असल्याची माहिती पोलिसांना दिली.

तेव्हा पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता सदर ठिकाणी तो मुलगा अपहरण झालेला मुलाच्या वर्णनाप्रमाणे मिळताजुळता आढळून आला. मात्र तो साडेतीन वर्षाचा मुलगा एका भंगारवाल्याचा असल्याची पोलिसांना खात्री झाली. पण अपहरण झालेला मुलगा सापडत नसल्याने पोलिसांनी त्या मुलाचे फोटो अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर परिसरात ठिकाणी व रिक्षांच्यावर लावून तसेच स्थानिक केबल नेटवर्कद्वारे त्या मुलाची माहिती प्रकाशित करून त्याचा शोध सुरू ठेवला होता. दरम्यान, काही रिक्षाचालकांच्या चर्चेतून गुन्ह्यातील अपहरण झालेल्या मुलाच्या वर्णनाप्रमाणे एक मुलगा उल्हासनगरातील कॅम्प नंबर 4 येथील भरत नगर परिसरात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.

अशी केली पोलिसांनी गुन्ह्याची उकल -
अंबरनाथ गुन्हे शाखेच्या पथकाने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भरत नगर परिसरातील एका घरातून अपहरण झालेल्या विकासची आरोपी पूजा हिच्या तावडीतून सुटका केली. पोलिसांनी आरोपी पूजाकडे अधिक चौकशी केली असता, हा मुलगा कोणीतरी माझ्या दारात सोडून गेल्याचे सांगितले. मात्र पोलिसांना तिच्या बोलण्यावर विश्वास पटत नसल्याने पोलिसांनी तिच्याकडे कसून चौकशी केली असता तिने अंबरनाथ येथील सर्कल मैदानाजवळ राहणारी महिला आरोपी जयनबी खान या महिलेकडून तिने विकास याला 70 हजार रुपये विकत घेतले असल्याचे पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी या दोन्ही महिलांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता आरोपी पूजा हिचा ओळखीचा आरोपी मुकेश उर्फ लालू याला एक लहान बाळ पाहिजे असल्याची माहिती आरोपी जयनवीला गेली होती. तर आरोपी माया काळे या महिलेने आरोपी जयनबीच्या सांगण्यावरुन विकासचे अपहरण केले होते. त्यानंतर आरोप शेरू याच्यामार्फत चिमुकल्याला आरोपी पूजाला 70 हजार रुपयात विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.