ठाणे - डोंबिवली पूर्व येथील मानपाडा येथील पोलीस ठाण्याच्या मागे असणाऱ्या रसायन कंपनीला सकाळी ६.५५ मिनिटांनी आग लागली. या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही.
या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळाले आहेत. आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. दोन तासांच्या प्रयत्नानंतर अग्नीशमन दलाचे जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले.