ETV Bharat / state

कल्याण : लिफ्टमध्ये अडकलेल्या तीन चिमुकल्यांची तब्बल दोन तासानंतर अग्निशमन दलाकडून सुटका - लिफ्टमध्ये अडकलेल्या मुलांची सुटका ठाणे

टिळक चौकात असणाऱ्या खेडा अव्हेन्यू नावाच्या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर काल संध्याकाळच्या सुमारास 3 जण अडकून पडली. यामध्ये 4 वर्षांची मुलगी, 8 आणि 12 वर्षांच्या दोन मुलांचा समावेश होता. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे काहीही केल्या या लिफ्टचा दरवाजा उघडत नव्हता.

kalyan thane latest news  child stranded in lift thane  fire dapartment thane news  ठाणे लेटेस्ट न्यूज  लिफ्टमध्ये अडकलेल्या मुलांची सुटका ठाणे  ठाणे अग्निशमन दल बातमी
कल्याणात लिफ्टमध्ये अडकलेल्या एक मुलगी अन् २ मुलांची अग्निशमन दलाकडून सुटका
author img

By

Published : Jun 10, 2020, 7:55 PM IST

ठाणे - तांत्रिक बिघाडामुळे तब्बल 2 तास लिफ्टमध्ये अडकून पडलेल्या 3 चिमुरड्यांची कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाने अवघ्या काही मिनिटात सुटका केली. कल्याण पश्चिमेतील टिळक चौक परिसरात हा प्रकार घडला.

लिफ्टमध्ये अडकलेल्या मुलांची अग्निशमन दलाने अशी केली सुटका

टिळक चौकात असणाऱ्या खेडा अव्हेन्यू नावाच्या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर काल संध्याकाळच्या सुमारास 3 जण अडकून पडली. यामध्ये 4 वर्षांची मुलगी, 8 आणि 12 वर्षांच्या दोन मुलांचा समावेश होता. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे काहीही केल्या या लिफ्टचा दरवाजा उघडत नव्हता. त्यामुळे सोसायटीने सुरुवातीला संबंधित लिफ्ट कंपनीच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना बोलवून प्रयत्न करून पाहीले. मात्र, तांत्रिक बिघाड शोधण्याचे अनेक प्रयत्न करूनही या कर्मचाऱ्यांना काही केल्या हा दरवाजा उघडता आला नाही. त्यानंतर अखेर कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाला याठिकाणी बोलवण्यात आले. महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळ न घालवता हायड्रॉलिक उपकरणाच्या सहाय्याने अवघ्या काही मिनिटांत लिफ्टचा दरवाजा उघडला आणि या तिन्ही मुलांची सुटका केली. ही मुलं सुखरूपपणे बाहेर आल्यानंतर त्यांच्या पालकांनी आणि इतर रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडत अग्निशमन दलाचे आभार मानले. कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाचे मुस्ताक मकानदार, विनायक लोखंडे यांच्यासह रमेश दिघे, निखिल ईसामे, मोनिश पाटील या जवानांनी हे रेस्क्यू ऑपरेशन केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.