नवी मुंबई - पनवेल महापालिका क्षेत्रात व येणाऱ्या धानसर गाव परिसरात असलेल्या एका गोदमाला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न अग्नीशमन विभागाकडून सुरू आहेत.
शॉर्टसर्किटमुळे लागली आग
रायगड व ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या व पनवेल महापालिका क्षेत्रात येणाऱ्या धानसर गावात असणाऱ्या भंगारच्या गोदमाला आग लागली आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा - धावत्या एसटीने घेतला पेट; वाहकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहे. जीवितहानी झाल्याची अद्याप माहिती प्राप्त झाली नसल्याचे अग्निशमन दलाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा - टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील रस्त्याचे काम दीड वर्षात पूर्ण होईल - आदिती तटकेर