ठाणे - भिवंडी तालुक्यात भीषण अग्नितांडव सुरूच असून आज पुन्हा पहाटेच्या सुमारास भिवंडी तालुक्यातील सरवली एमआयडीसी परिसरात असलेल्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. कपिल रेयॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड असे या कंपनीचं नाव असून या कंपनीच्या दोन मजली इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून आगीचे कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे.
अग्निशामक दलाचे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू
कपिल रेयॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कच्च्या कपडा व धाग्यांचे मोठ्या प्रमाणात साठवणूक करून ठेवली होती. मात्र अचानक पहाटे या कंपनीला भीषण आग लागल्याची माहिती मिळतात अग्निशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम अग्निशमन दलाचे जवान करीत आहे. तर दुसरीकडे या आगीत कोणीही अद्यापपर्यंत जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र आतापर्यंत कंपनीतील लाखो रुपयांचे धागे व कच्च्या कपड्यांचे पागे जळून खाक झाले आहेत.
डोंबिवली एमआयडीसीमध्ये देखील आगीची घटना
डोंबिवली एमआयडीसीमधील एका रिसर्च सेंटरला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी घडली. या आगीच्या घटनेमुळे डोंबिवली एमआयडीसी परिसरात एकच खळबळ उडाली होती. गॅलेक्सी फार्मासिटीकल रिसर्च सेंटर असे आग लागलेल्या कंपनीचे नाव आहे. या रिसर्च सेंटरमध्ये नवीन प्रोडक्ट तयार करणाऱ्याचे काम होत असतानाच कंपनीला अचानक आग लागली.
यापूर्वी घडल्या आगीच्या घटना -
डोंबिवली एमआयडीसी परिसरातील खंबाळपाडा भागात शक्ती प्रोसिंग कंपनीला १८ डिसेंबरला आग लागल्याची घटना घडली होती. त्यावेळी कंपनीला आग लागताच आतील कामगार तातडीने बाहेर पडल्याने जीवितहानी टळली होती. मात्र, आतापर्यंत या भीषण आगीत संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती.
हेही वाचा - सोन्याच्या दुकानातील चोरीचा पर्दाफाश; आरोपींना गुन्हे शाखेने केले गजाआड...!
हेही वाचा - मिरा भाईंदर मध्ये 'बर्ड फ्लू'चा शिरकाव, २५ कावळ्यांसह ९ कबुतरांचा मृत्यू