ETV Bharat / state

मलंगगडाच्या डोंगरावर वणवा; हजारो झाडे जळून खाक - अंबरनाथ तालुका वणवा

अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडाच्या डोंगरावर पेटलेल्या वणव्याने विक्राळ रूप धारण केले आहे. वन विभागाचे अधिकारी कर्मचारी अग्निशमन दलाच्या गाड्यांसह घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

अंबरनाथ तालुक्यात डोंगरावर पेटला वणवा
अंबरनाथ तालुक्यात डोंगरावर पेटला वणवा
author img

By

Published : Mar 5, 2020, 11:48 PM IST

Updated : Mar 6, 2020, 7:27 AM IST

ठाणे - अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागातील डोंगरात वणवा पेटला आहे. या वणव्याने रौद्ररुप धारण केले असून घटनास्थळी दाखल झालेले वन विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांचे आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडाच्या डोंगरावर पेटला वणवा

अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड येथील कुंभार्ली गावच्या डोंगरावर भीषण वणवा पेटल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी कर्मचारी, अग्निशमन दलाच्या गाड्यांसह घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, वणव्याच्या आगीची भीषणता अधिक असल्याने आग नियंत्रणात आणण्यासाठी कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यातच आगीचा वणव्याने रौद्ररूप धारण केल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पहाट होण्याची शक्यता अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - देवेंद्र फडणवीस यांची क्रिकेट मैदानात फटकेबाजी

दरम्यान, गेल्याच वर्षी राज्यात ५३ कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमाचाच एक भाग म्हणून शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसहभागातून हाजी मलंग पट्ट्यातील मांगरूळ येथील वन विभागाच्या जमीनीवर ८० भागात एक लाख वृक्षांची लागवड केली होती. तर, गेल्या जुलै महिन्यात अंबरनाथ येथील कोहोज खुंटवली येथील वन विभागाच्या २५ एकर भागात ५८ हजार वृक्षांची लोकसहभागातून वृक्ष लागवड करण्यात आली होती. मात्र, त्यावेळीही मांगरूळ येथील वृक्ष लागवडीच्या ठिकाणी लावलेल्या आगीत ७ हजार झाडे जळाल्याप्रकरणी ठाण्यात खासदार शिंदे यांनी मोर्चा काढत वन विभागाच्या अधिकाऱयांना धारेवर धरले होते. याप्रकरणी त्यांनी राख आणि कुंड्या फेकत आपला निषेध व्यक्त केला होता.

अंबरनाथचे वन अधिकारी चंद्रकात शेळके यांना दोषी ठरवत निलंबित केले होते. विशेष म्हणजे त्यावेळी तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांगरूळ आग प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले होते. वृक्ष लागवडीच्या आगीचे प्रकरण तापत असतांनाच, गुरुवारी रात्रीच्या सुमारास मलंगगड येथील कुंभार्ली गावच्या डोंगरावर भीषण वणवा पेटल्याची घटना समोर आली आहे. तर, वारंवार मलंग गडाच्या डोंगरावर लागणाऱ्या वणव्यामुळे संशयचा धूरही निर्माण झाला आहे.

हेही वाचा - इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा, वंचित बहुजन आघाडीचे ठाण्यात उपोषण

Last Updated : Mar 6, 2020, 7:27 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.