ETV Bharat / state

Financial Fraud With Drug Seller: शेअर बाजारातून दामदुप्पटचे आमिष दाखवून औषध विक्रेत्याला घातला ५० लाखांचा गंडा - Financial Fraud With Drug Seller

Financial Fraud With Drug Seller : मोबाईल आणि ई-मेल द्वारे एका औषध विक्रेत्याला तीन भामट्यांनी संगनमत करून शेअर बाजारात गुंतवणुकीतून दामदुप्पटचे आमिष (drug seller was cheated of 50 lakhs) दाखवून ५० लाखांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी डोंबिवली पश्चिम भागातील विष्णुनगर पोलीस ठाण्यात औषध विक्रेत्याच्या तक्रारीवरून भामट्यांच्या त्रिकुटावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Financial Fraud With Drug Seller
आर्थिक फसवणूक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2023, 10:47 PM IST

ठाणे Financial Fraud With Drug Seller: मोहित शर्मा, रिचा गुप्ता आणि अंगद अशी ऑनलाईन गंडा घालणाऱ्या गुन्हेगारांची नावे आहेत. तर गिरीशकुमार चम्पालाल व्यास (वय ३६) असे फसवणूक झालेल्या औषध विक्रेत्याचे नाव आहे. (drug seller was cheated of 50 lakhs)

दामदुपटीचे आमिष : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार व्यास डोंबिवलीतील रामनगर भागात कुटुंबासह राहत असून त्यांचा विविध औषधे विक्रीचा व्यवसाय आहे. त्यातच एप्रिल २०२३ पासून तिन्ही आरोपींनी औषध विक्रेते गिरीशकुमार यांना मोबाईल आणि ई मेल द्वारे संपर्क साधण्यास सुरुवात केली. या दरम्यान त्यांना जी. टेक ट्रेडर्स, अभि एन्टरप्रायझेस या गुंतवणूक कंपन्यांमधील शेअरमधील गुंतवणूक योजनांची माहिती देऊन आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर गिरीशकुमार यांना शेअर बाजारातील कंपन्यात गुंतवणूक केली तर आपणास दामदुप्पट पैसे अल्पावधीत मिळतील, असे आमिष भामट्यांनी गिरीशकुमार यांना दिले.

चार महिन्यात एक पैसाही नाही: गिरीशकुमार यांचा विश्वास संपादन केल्यानंतर भामट्यांनी ऑनलाईन आरटीजीएस, गुगल पे, आयएमपीएसच्या माध्यमातून व्यास यांच्याकडून ५० लाख ५२ हजार गुंतवणुकीसाठी लागणारे विविध कर भार, शेअरमधील ठेव रकमेच्या नावाने चार महिन्यात वसूल केले. शिवाय गुंतवणूक केलेली रक्कम तुम्हाला दामदुप्पट पध्दतीने पाहिजे तेव्हा मिळेल. लाभाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल, असे भामट्यांनी गिरीशकुमार यांना सांगितले. चार महिने उलटुनही लाभाचा एक पैसा बँक खात्यात जमा झाला नाही.

अखेर भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल: अस्वस्थ झालेल्या गिरीशकुमार व्यास यांनी मूळ रक्कम परत मागण्याचा तगादा भामट्यांकडे लावला असता, तिन्ही भामट्यांनी सुरुवातीला त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर ते गिरीशकुमार यांच्या संपर्काला प्रतिसाद देईनासे झाले. सतत तगादा लावूनही लाभ नाहीच, पण मूळ रक्कमही परत मिळत नसल्याने आपली फसवणूक झाली आहे, याची खात्री गिरीशकुमार यांना झाली. यानंतर त्यांनी १ ऑगस्ट रोजी विष्णुनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिन्ही भामट्या विरोधात सायबर गुन्हांसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या आधारे सायबर पथकांसह पोलिसांनी त्या तिन्ही भामट्यांचा शोध सुरू केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राहुल खिलारे करत आहेत.

हेही वाचा:

  1. Bhandara Crime: क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक; दोन आरोपींवर गुन्हा दाखल
  2. ST Kamgar Bank Financial Fraud: ST कामगार बँकेत गैरव्यवहार?; निवडणुकीआधीच राजकारण तापण्याची शक्यता
  3. Holiday Package Fraud: 'हॉलिडे पॅकेज'च्या नावाखाली हुश्शार पुणेकरांना कोट्यवधी रुपयांचा चुना; कंपनीकडून 'नो रिस्पॉन्स'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.