ETV Bharat / state

MP Shrikant Shinde on MHADA : म्हाडा लाभार्थ्यांचा शेवटचा हफ्ता माफ करण्यावर शिक्कामोर्तब; खासदार श्रीकांत शिंदेंची माहिती - शेवटचा १० टक्क्यांचा हफ्ता माफ

म्हाडाच्या लाभार्थ्यांचा शेवटचा 10 टक्क्यांचा हफ्ता माफ करण्यात यावा, अशी मागणी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केली होती. म्हाडाच्या या बैठकीत या ठरावाला मान्यता देण्यात आली आहे. तसेच यामुळ म्हाडाच्या लाभार्थ्यांचे 32 कोटी रूपये वाचणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.

MP Shrikant Shinde on MHADA
श्रीकांत शिंदे
author img

By

Published : Jan 20, 2023, 7:08 PM IST

ठाणे : करोनाच्या लॉकडाऊन आणि इतर कारणांमुळे म्हाडाने बांधलेल्या परवडणाऱ्या घरांचा ताबा देण्यास उशिर झाला. यामुळे कल्याण तालुक्यातील खोणी आणि शिरढोन येथील लाभार्थ्यांचे आर्थिक नुकसान झाले होते. या लाभार्थ्यांच्या शेवटचा १० टक्क्यांचा हफ्ता माफ करण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली होती. या मागणीला यापूर्वी तत्वतः मंजुरी देण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या म्हाडाच्या बैठकीत या ठरावाला मान्यता देण्यात आली असून या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. या निर्णयामुळे लाभार्थांचे सुमारे ३२ कोटी रूपये वाचणार असून त्यांना दिलासा मिळाला असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.

कोरोनामुळे प्रक्रिया मंदावली : म्हाडामार्फत विविध शहरांमध्ये उभारण्यात येणारी घरे ही किफायतशीर दरात नागरिकांना मिळत असतात. याच पद्धतीने म्हाडाच्यावतीने कल्याण तालुक्यातील खोणी आणि शिरढोण तालुक्यात परवडणाऱ्या दरातील घरे उभारण्यात आली होती. या घरांसाठीची २०१८ साली सोडत काढण्यात आली होती. तर २०२१ पर्यंत विजेत्यांना घराचा ताबा देणे अपेक्षित होते. मात्र, या दरम्यान आलेला करोनामुळे ही प्रक्रिया धीम्या गतीने राबविली गेली. त्यामुळे लाभार्थ्यांना घरांचा ताबा मिळाला नाही. त्याचवेळी या घरांच्या कर्जापोटी लाभार्थ्यांना बँकांचे हफ्ते भरावे लागत होते.

श्रीकांत शिंदेंनी केली होती मागणी : एकीकडे ताबा न मिळालेल्या घरांचा हफ्ता तर दुसरीकडे ज्या घरात भाड्याने राहतो त्या घराचे भाडे अशा दुहेरी आर्थिक कोंडीमध्ये हे लाभार्थी अडकले होते. त्यातच करोनामुळे नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडल्याने लाभार्थ्यांचे हाल सुरू होते. या लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी घराचा शेवटचा हफ्ता माफ करण्यात यावा, अशी मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी म्हाडा प्रशासनाकडे केली होती.

2000 हजार लाभार्थ्यांना फायदा : कोकण गृहनिर्माण महामंडळ आणि म्हाडा समवेत याबाबत अनेक वेळा बैठका घेत पत्रव्यवहार देखील केला होता. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत कोकण गृहनिर्माण मंडळातर्फे नागरिकांच्या घराचा शेवटचा हफ्ता माफ करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या म्हाडाच्या बैठकीत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे येथील दोन हजार लाभार्थ्यांना याच थेट फायदा होणार आहे.

32 कोटींची बचत : म्हाडा प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे खोणी आणि शिरढोन प्रकल्पातील प्रत्येक विजेत्याचे १ लाख ६३ हजार रुपयांनुसार सर्व नागरिकांचे ३२ कोटी ६२ लाख रुपये वाचले आहेत. लाभार्थ्यांची संख्या दोन हजारांहून अधिक आहे. म्हाडाने घेतलेला हा निर्णय आहे. यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. म्हाडाच्या लाभार्थ्यांची आर्थिक कोंडी पाहता शेवटचा हफ्ता माफ करण्याची मागणी केली होती. त्यामागणीवर निर्णय झाला असून लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. यापूर्वी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातल्या बीएसयुपी घरांचा पालिकेचा वाटा देण्यापासून सुट मिळवण्याचा निर्णय झाल्याची माहिती खासदार, डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

हेही वाचा : Shiv Sena Symbol Hearing : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण ठाकरेंचे की शिंदेंचे? निवडणूक आयोगात सुनावणी सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.