ठाणे - भिवंडीत मंगळवारी एकाच दिवसात कोरोनाचे तब्बल ४२ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ग्रामीण भागातही ११ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. याशिवाय ग्रामीण भागातील काल्हेर येथील ३४ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ग्रामीण आणि शहरात आज एकूण ५३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
भिवंडी शहरात आतापर्यंत एकूण ३२६ रुग्ण आढळले असून त्यापैकी १३३ रुग्ण बरे झाले आहेत. तर २१ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या १७२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ग्रामीण भागात आतापर्यंत १८३ रुग्ण आढळले असून त्यापैकी ७७ रुग्ण बरे झाले आहेत. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला असून १०२ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.
मंगळवारी आढळलेल्या ५३ नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील शहर व ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ५०९ वर पोहचला आहे. त्यापैकी २१० रुग्ण बरे झाले आहेत. तर, २५ रुग्णांचा मृत्यू झाला असून २७४ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.