ठाणे - उल्हासनगर कॅम्प 2 मधील फर्निचर मार्केटमधील एका दुकानाला भीषण आग लागली होती. ही घटना आज (शुक्रवारी) सकाळच्या सुमारास लागली. या भीषण आगीत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, लाखो रूपयांचे फर्निचर जळून खाक झाले आहे.
उल्हासनगरमधील फर्निचर मार्केट परिसरात असलेल्या 3 मजली गोल्डी फर्निचर हे दुकान आहे. या दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर आज (गुरूवारी) सकाळच्या सुमाराला अचानक भीषण आग लागली. ही आग तिसऱ्या मजल्यापर्यंत गेली. त्यावेळी धुराचे लोट मार्केट परिसरात पसरले होते तर सकाळची वेळ असल्याने मार्केटमधील बहुतांशी दुकाने बंद असल्यामुळे गोंधळ उडाला नाही.
हेही वाचा - आमचा मुख्यमंत्री, तुमचा मुख्यमंत्री हा पोरखेळ थांबवा आता - एकनाथ गायकवाड
आगीची माहिती मिळताच उल्हासनगर अग्निशामक दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तर त्यांना आगीवर दीड तासांत नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, या भीषण आगीत दुकानातील लाखोंचे फर्निचर जळून खाक झाले आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता अग्निशमन दलाच्या जवानांकडून वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा - मॉडर्न पुणे: घरकाम करणाऱ्या गीता मावशी व्हीझीटिंग कार्डमुळे सोशल मीडियावर व्हायरल