ठाणे - एक वडील आपल्या ३ वर्षांच्या चिमुरड्याला पिस्तूल कसे लोडेड करायचे, याचे प्रशिक्षण देत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे खळबळ उडाली असून, हा व्हिडिओ जिल्ह्यातील टिटवाळा शहरातील असल्याची माहिती समोर आली आहे
लहान मुलांना अत्याधुनिक बंदुका हाताळण्याचे प्रशिक्षण तालिबान्यांनी दिले असल्याचे व्हिडिओ आपण सोशल मीडियावर अनेकदा पाहिले. २ दिवसांपूर्वीच एका भाजप आमदाराने दोन्ही हातात पिस्तूल घेऊन डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता ही घटना समोर आली.
टिटवाळा येथे राहणारी आदर्श उपाध्याय या नावाची व्यक्ती आपल्या तीन वर्षांच्या चिमुरड्याच्या हातात पिस्तूल देऊन ती कशी हाताळायची याचे प्रशिक्षण देत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.