ETV Bharat / state

दुष्काळग्रस्त शेतमजुरांचे भिवंडीत स्थलांतर; पोटाची खळगी भरण्यासाठी गुंतले नालेसफाईच्या कामात - water

तीव्र उन्हाळा असल्यामुळे ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष सुरू आहे. त्यामुळे शेतीची कामे बंद झाली आहेत. परिणामी शेतमजूर पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या कुटूंबीयांसह भिवंडी शहराच्या आश्रयाला आला आहे.

शेतमजूरांचे भिवंडीत स्थलांतर
author img

By

Published : May 31, 2019, 4:16 PM IST

ठाणे - सद्या सर्वत्र रेकॉर्डब्रेक तीव्र उन्हाळा असल्यामुळे ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष सुरू आहे. त्यामुळे शेतीची कामे बंद झाली आहेत. परिणामी शेतमजूर पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या कुटूंबीयांसह भिवंडी शहराच्या आश्रयाला आला आहे. येथे त्याला नालेसफाईची काम करून उदरनिर्वाह करावा लागत आहे.
सध्या शहरात भिवंडी महानगरपालिकेमार्फत ठिकठिकाणी गटार, नालेसफाई सुरू झाली आहे. त्यापैकी नदीनाका, चाविंद्रा, नागाव, खंडूपाडा आदी भागात रोजंदारी कामगारांकडून नालेसफाई सुरू आहे. या कामाच्या ठिकाणी स्थलांतरीत कामगार समाधानकारक काम करत आहेत. तर वंजारपट्टी नाका येथील उड्डाणपुलाखाली वास्तव्य करून त्यांनी उघड्यावर संसार थाटून त्याच ठिकाणी स्वयंपाक करून आपली भूक भागवित आहेत.
पंधरा दिवसानंतर पावसाला सुरुवात होणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्यास आम्ही लवकरच गावाकडे परत जाणार आहोत, अशी माहिती या मजूरांनी दिली आहे.

दुष्काळग्रस्त शेतमजूर पोटाची खळगी भरण्यासाठी गुंतले नालेसफाईत ; मजूरांना पोटासाठी करावे लागले स्थलांतर ! 

ठाणे :- खान्देशातील चाळीसगाव, मालेगाव, भुसावळ, जळगाव व पाचोरा आदी  तालुक्याच्या ग्रामिण भागात पाण्याचे दुर्भिक्ष सुरु असल्याने शेतीची कामे बंद झाली आहेत. त्यातच  पिण्याचे पाणीही  मिळणे अवघड झाल्याने पोटासाठी रोजगार उपलब्ध होत नसल्याने  मजूर कुटुंबियांचे अतोनात हाल  सुरु  आहेत. त्यामुळे रोजगाराच्या शोधासाठी  काही शेतमजूरांनी  आपल्या कुटूंबियांसह भिवंडी शहराच्या  आश्रयाला येत, नालेसफाई करून पोटाची खळगी भरत आहे. तर वंजारपट्टी नाका  येथील उड्डाणपुलाखाली वास्तव्य करून त्यांनी उघड्यावर संसार थाटून त्याच ठिकाणी स्वयंपाक  करून आपली भूक भागवित आहेत.

सद्या सर्वत्र रेकॉर्डब्रेक  तीव्र उन्हाळा असल्यामुळे मराठावाडा, खान्देश, विदर्भ आदी विविध भागातील  नागरीकांसह  शेतमजूर, कामगारांचे अतोनात हाल होत आहेत. पाण्याच्या भीषण टंचाईमुळे  रोजगाराचे सर्वच मार्ग बंद झाल्याने मजूर कुटूंबियांची  हालाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बहुतांश कामगार रोजगार मिळवण्यासाठी विविध शहरात जात आहेत. यातील बहुतांश कामगार भिवंडीत आले आहेत. सध्या शहरात भिवंडी महानगरपालिकेमार्फत ठिकठिकाणी  गटार, नालेसफाई सुरू झाली आहे. त्यापैकी नदीनाका, चाविंद्रा, नागाव, खंडूपाडा आदी  भागात रोजंदारी कामगारांकडून नालेसफाई सुरू आहे. या कामाच्या ठिकाणी  स्थलांतरीत कामगार  समाधानकारक काम करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. हि  नालेसफाई करण्यासाठी रोजंदारी मजूरांना ४०६ रूपये रोजंदारी दिली  जात असल्याची माहिती मजूरांनी दिली. हे मजूर धूळे, जळगांव, चाळीसगाव, मालेगाव, भुसावळ, पाचोरा या भागातून नाशिकमार्गे शहरात आले असून ते आपल्या कुटूंबासह भिवंडीतील वंजारपट्टी नाका येथील उड्डाणपुलाखाली वास्तव्यास आहेत. तेथेच त्यांनी आपला उघड्यावर संसार थाटला  असून त्याच ठिकाणी स्वयंपाक करून आपली भूक भागवित आहेत.

विशेष म्हणजे गावाकडे शेतमजूर म्हणून नवरा, बायको दोघे काम करतात. परंतू महानगरपालिकेच्या नालेसफाईसाठी केवळ पुरूषांनाच  रोजगार मिळत आहे. त्यामुळे  त्यांना या तुटपुंज्या मजुरीवर कसेबसे दिवस काढावे लागत आहेत. पंधरा दिवसानंतर पावसाला सुरुवात होणार असल्याचे संकेत हवामान खात्याने वर्तवले आहेत. त्यानंतर गावाकडे समाधानकारक पाऊस झाल्यास शेतमजूर आपल्या गावाकडे निघणार आहेत. अशी माहिती मजूरांनी दिली आहे. 

I’m protected online with Avast Free Antivirus. Get it here — it’s free forever.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.