ETV Bharat / state

रिलायन्स गॅस पाईपलाईनसाठी संपादित जमिनीचा योग्य मोबदला द्या, कंपनीविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

भिवंडी तालुक्यातील दलोंडे येथे रिलायन्स गॅस पाईपलाईनमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले. मार्क्सवादी पक्षाकडून ही सभा आयोजित करण्यात आली होती.

thane
आंदोलन
author img

By

Published : Feb 5, 2020, 10:34 PM IST

Updated : Feb 5, 2020, 11:00 PM IST

ठाणे - रिलायन्स कंपनीच्या गॅस पाईपलाईनसाठी भिवंडी तालुक्यातील संपादित होणाऱ्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाल्याशिवाय काम करू दिले जाणार नसल्याची भूमिका घेत, रिलायन्स कंपनीविरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे.

रिलायन्स गॅस पाईपलाईनसाठी संपादित जमिनीचा योग्य मोबदला द्या, कंपनीविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

भिवंडी तालुक्यातील दलोंडे येथे रिलायन्स गॅस पाईपलाईनमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले. मार्क्सवादी पक्षाकडून ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्य सेक्रेटरी कॉ. राजेंद्र परांजपे, ठाणे -पालघर जिल्हा अध्यक्ष बळीराम चौधरी, कॉ.संज्योत राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

ठाणे व पालघर जिल्ह्यातून रिलायन्स गॅस पाईपलाईन शेतकऱ्यांच्या जमिनीमधून जात आहे. काही ठिकाणी या गॅस प्रकल्पाचे काम झाले आहे. तर, काही ठिकाणी सुरू आहे. मात्र, या प्रकल्पात भिवंडी तालुक्यातील दलोंडे, जांभिवली, दिघाशी या परिसरातील शेतकऱ्यांनी योग्य मोबदला द्या तरच काम करा, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आल्याने गॅस प्रकल्प अधिकारी व शेतकऱ्यांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.

यावेळी भर उन्हात महिलावर्ग आणि शेतकरी मोठ्या संख्येने एल्गार सभेत उपस्थित होते. दहेज ते नागोठणे रिलायन्स गॅस पाईपलाईन अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांना होत असलेली अरेरावी, सर्व शासकीय आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून तेथे औषधसाठा उपलब्ध करून देण्यात यावा, सर्वांना शिक्षण आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी, इको झोनमध्ये अडचणीत आलेल्या विट उत्पादकांना उभय द्या, अशा अनेक मागण्या त्यांनी केल्या.

गुजरात राज्यातील दहेज ते रायगड जिल्ह्यतील नागोठणे या दरम्यान टाकण्यात येत असलेल्या गॅस पाईपलाईनसाठी भिवंडीतील अधिग्रहित केलेल्या जमिनीचा मोबदला न देताच गॅस पाईपलाईनचे काम हाती घेतले होते. तसेच रिलायन्स गॅस कंपनीने स्थानिक राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरून बाधित शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला न देताच, शेतात खोदकाम करून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केले होते. त्यातच रिलायन्सकडून मिळणाऱ्या मोबदल्यात बाधित शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा आरोप करत गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी ओरड करत आहेत. मात्र, रिलायन्स कंपनी पोलिसांची मदत घेऊन दहशत निर्माण करून शेतक-यांचा विरोध चिरडून टाकत असल्याचा आरोप बाधितांकडून करण्यात आला.

दरम्यान, मागील महिन्यात तालुक्यातील दाभाड परिसरातील किरवली, कोटाची जांभीवली या भागात स्थानिक पोलिसांच्या फौजफाट्यात रिलायन्स गॅस पाईपलाईन कंपनीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र, येथील शेतकऱ्यांना अजून जमिनीचा योग्य मोबदला कंपनीने दिलेला नाही. तर ,काही गावांमध्ये तुटपूंजा मोबदला देऊन शेतकरी कुटूंबांना वेठीस धरण्याचे कटकारस्थान रिलायन्स कंपनी व्यवस्थापनाने सुरू केल्याचा आरोप बाधित शेतकऱ्यांनी केला आहे.

Intro:Body:रिलायन्स गॅस पाईपलाईनसाठी संपादित जमीनीच्या योग्य मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

ठाणे ; रिलायन्स कंपीनीच्या गॅस पाईपलाईनसाठी भिवंडी तालुक्यातील संपादित होणाऱ्या जमीनीचा योग्य मोबदला मिळाल्याशिवाय काम करू दिले जाणार नसल्याची भुमिका घेत, रिलायन्स कंपीनीच्या विरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे.
भिवंडी तालुक्यातील दलोंडे येथे रिलायन्स गॅस पाईपलाईनमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांची एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले. मार्क्सवादी पक्षाकडून ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्य सेक्रेटरी काॅ. राजेंद्र परांजपे, ठाणे -पालघर जिल्हा अध्यक्ष बळीराम चौधरी, काॅ.संज्योत राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
पालघर व ठाणे व पालघर जिल्ह्यातून रिलायन्स गॅस पाईप लाईन शेतकऱ्यांच्या जमिनीमधून जात आहे. काही ठिकाणी या गॅस प्रकल्पाचे काम झाले आहे. तर काही ठिकाणी सुरू आहे. मात्र या प्रकल्पात भिवंडी तालुक्यातील दलोंडे, जांभिवली, दिघाशी या परिसरातील शेतकऱ्यांनी योग्य मोबदला द्या तरच काम करा अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आल्याने गॅस प्रकल्प अधिकारी व शेतकऱ्यांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे यावेळी भर उन्हात सभेला महीलावर्ग आणि शेतकरी मोठ्या संख्यने एल्गार सभेत उपस्थित होते. दहेज ते नागोठणे रिलायन्स गॅसपाईप लाईन अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांना होत असलेली अरेरावी, सर्व शासकीय आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून तेथे औषध साठा उपलब्ध करून देण्यात यावा, .सर्वांना शिक्षण आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी, इको झोनमध्ये अडचणीत आलेल्या विट उत्पादकांना उभय द्या, यावर चर्चा करून आली
गुजरात राज्यातील दहेज ते रायगड जिल्ह्यतील नागोठणे या दरम्यान टाकण्यात येत असलेल्या गॅस पाईपलाईनसाठी भिवंडीतील अधिग्रहित केलेल्या जमिनीचा मोबदला न देताच गॅस पाईपलाईनचे काम हाती घेतलेल्या रिलायन्स गॅस कंपनीने स्थानिक राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरून बाधित शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला न देताच, शेतात खोदकाम करून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु केले होते. त्यातच रिलायन्सकडून मिळणाऱ्या मोबदल्यात बाधित शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा आरोप करीत गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी ओरड करीत आहेत. मात्र रिलायन्स कंपनी पोलिसांची मदत घेऊन दहशत निर्माण करून शेतक-यांचा विरोध चिरडून टाकत असल्याचा प्रकार समोर अनेकवेळा समोर आले आहे.
गेल्याच महिन्यात तालुक्यातील दाभाड परिसरातील किरवली ,कोटाची जांभीवली या भागात स्थानिक पोलिसांच्या फौजफाट्यात रिलायन्स गॅस पाईपलाईन कंपनीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. मात्र येथील शेतकऱ्यांना आजपावेतो जमिनीचा योग्य मोबदला रिलायंस कंपनीने दिलेला नाही. तर काही गावांमध्ये तुटपूंजा मोबदला देऊन शेतकरी कुटूंबांना वेठीस धरण्याचे कटकारस्थान रिलायंस कंपनी व्यवस्थापनाने सुरु केल्याचा आरोप बाधित शेतकऱ्यांनी केला आहे.
Bayet - राज्य सेक्रेटरी काॅ. राजेंद्र परांजपे,
Conclusion:
Last Updated : Feb 5, 2020, 11:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.