ETV Bharat / state

मुंबई-वडोदरा मार्गात बाधित शेतकरी महिलेची मोबदल्यासाठी प्रांत कार्यालयातच आत्महत्येचा प्रयत्न - मुंबई-वडोदरा महामार्ग

मुंबई - वडोदरा महामार्गात बाधित शेतकरी महिलेला मोबदला न देता, प्रांत अधिकाऱ्याने दुसऱ्याच व्यक्तीला मोबदला दिल्याचे आदेश दिले. याप्रकरणी त्या शेतकरी महिलेने व्यथित होऊन कल्याणच्या प्रांत कार्यालयातच कीटकनाशक विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

thane
महिलेचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न
author img

By

Published : Feb 7, 2020, 10:55 PM IST

Updated : Feb 7, 2020, 11:36 PM IST

ठाणे - मुंबई - वडोदरा महामार्गात बाधित शेतकरी महिलेला मोबदला न देता, प्रांत अधिकाऱ्याने दुसऱ्याच व्यक्तीला मोबदला दिल्याचे आदेश दिले. याप्रकरणी त्या शेतकरी महिलेने व्यथित होऊन कल्याणच्या प्रांत कार्यालयातच कीटकनाशक विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कुसुम सुरोशी असे आत्महत्या करणाऱ्या शेतकरी महिलेचे नाव असून ती कल्याण तालुक्यातील रायता गावाची रहिवाशी आहे. तर, या घटनेमुळे प्रांत कार्यलयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

निखील सुरोशी

हेही वाचा - पाणीपुरीचा ठेला ते रेस्टॉरंट... वाचा बांद्रातील 'एल्को रेस्टॉरंट'ची यशोगाथा

कल्याण तालुक्यातील रायता येथे राहणाऱ्या कुसुम सुरोशी यांची सातबाऱ्यावर नाव असलेली शेतजमीन मुबंई - वडोदरा महामार्गात बाधित होत आहे. या मार्गात बाधित होणाऱ्या जमिनीचा मोबदला १ कोटी ३ लाख ६९ हजार इतकी होत आहे. हा मोबदला सुरोशी कुटुंबाला मिळावा म्हणून पाठपुरावा करत होती. परंतु पमनामी नावे व्यक्तीने हरकत घेत, ती जमीन त्याने विकत घेतली, असे कुळमुख्यातरपत्र प्रांत कार्यालयात सादर करत आपला दावा केला. मात्र, त्यामध्ये मृत असलेल्या ठमाबाई महिलेचे नाहरकत पत्र घेत खरेदी केल्याचे सादर करत मोबदल्यासाठी दावा केल्याने याबाबत प्रांतकडे ९ सुनवण्या झाल्या. मात्र, आज मोबदला पमनानीला देण्यात आल्यानंतर सुरोशी कुटुंबाने प्रांत कार्यालयात धाव घेत याबाबत प्रांताना जाब विचारत पमनानीला दिलेला मोबदला थांबवण्याची मागणी केली. मात्र, प्रांत अधिकाऱ्याने नकार दिल्याने कुसुम हिने प्रांत कार्यालयातच कीटकनाशक पित आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर कुसुम हिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्रांत अधिकारी नितीन महाजन

सातबारा आमच्या नावावर असताना प्रांत अधिकाऱ्यांनी नोटरी करत मोबदला पमनानी यांच्या नावावर केला असून गेल्या वर्षभरापासून आम्हीं याबाबत पाठपुरावा करत होतो. आज हा मोबदला पमनानीला दिल्यानंतर आम्ही याचा जाब प्रांत अधिकाऱ्यांना विचारला यावेळी माझ्या आईने कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची प्रतिक्रिया निखील सुरोशी यांनी दिली.

दरम्यान, रायता येथील ८०/२ सर्वे नंबर सातबारा वरील शेतकऱ्यांना मोबदला पत्र देण्यात आले होते. यावर हरकतदाराने नोंदणीकृत खरेदीखत रजिस्टर केलेले सादर केले. वर्षभरात ९ सुनावण्या केल्या. नोंदणीकृत खरेदीखताने जमीन खरेदी केली असल्याने हा मोबदला पमनानी याला देण्यात आला. मात्र, आज दुपारच्या सुमाराला सुरोशी यांच्या हरकतीनंतर मोबदला थांबवण्यात आला असल्याची प्रतिक्रिया प्रांत अधिकारी नितीन महाजन यांनी दिली.

Intro:kit 319Body:मुंबई-वडोदरा महामार्गात बाधित शेतकरी महिलेची मोबदल्यासाठी प्रांत कार्यालयातच आत्महत्येचा प्रयत्न

ठाणे : मुंबई - वडोदरा महामार्गात बाधित शेतकरी महिलेला मोबदला न देता, प्रांत अधिकाऱ्याने दुसऱ्याच व्यक्तीला मोबदला दिल्याचे आदेश त्या शेतकरी महिलेने व्यथीत होऊन कल्याणच्या प्रांत कार्यालयातच कीटकनाशक विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. कुसुम सुरोशी असे आत्महत्या करणाऱ्या शेतकरी महिलेचे नाव असून ती कल्याण तालुक्यातील रायता गावाची रहिवाशी आहे. तर या घटनेमुळे प्रांत कार्यलयातील अधिकारी ,कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
कल्याण तालुक्यातील रायता येथे राहणाऱ्या कुसुम सुरोशी यांची सातबाऱ्यावर नाव असलेली शेत जमीन मुबंई - वडोदरा महामार्गात बाधित होत असुन या मार्गात बाधित होणाऱ्या जमिनीची मोबदला १ कोटी ३ लाख ६९ हजार इतकी होत आहे. हा मोबदला सुरोशी कुटुंबाला मिळावा म्हणून पाठपुरावा करीत होती. परंतु पमनामी नावे व्यक्तीने हरकत घेत, ती जमीन त्याने विकत घेतली असे कुळमुख्यातरपत्र प्रांत कार्यलयात सादर करीत आपला दावा केला. मात्र त्यामध्ये मृत असलेल्या ठमाबाई महिलेचे नाहरकत पत्र घेत खरेदी केल्याचे सादर करीत मोबदल्यासाठी दावा केल्याने याबाबत प्रांतकडे ९ सुनवण्या झाल्या.
मात्र आज मोबदला पमनामीला देण्यात आल्यानंतर सुरोशी शेतकरी कुटुंबाने प्रांत कार्यालयात धाव घेत याबाबत प्रांताना जाब विचारत पमनानीला दिलेला मोबदला थांबविण्याची मागणी केली. मात्र प्रांत अधिकाऱ्याने नकार दिल्याने कुसुम हिने प्रांत कार्यालयातच (फोरेक्स) हे कीटकनाशक प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर कुसुम हिला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सातबारा आमच्या नावावर असतांना प्रांत अधिकाऱ्यांनी नोटरी करीत मोबदला पमनानी याच्या नावावर केला असून गेल्या वर्षभरापासून आम्हीं याबाबत पाठपुरावा करीत होतो. आज हा मोबदला पमनानीला दिल्यानंतर आम्ही याचा जाब प्रांत अधिकाऱ्यांना विचारला यावेळी माझ्या आईने कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची प्रतिक्रिया निखील सुरोशी यांनी दिली.
दरम्यान, रायता येथील ८०/२ सर्वे नंबर सातबारा वरील शेतकऱ्यांना मोबदला पत्र देण्यात आले होते. यावर हरकतदाराने नोंदणीकृत खरेदीखत रजिस्टर केलेले सादर केले. वर्षभरात ९ सुनावण्या केल्या. नोंदणीकृत खरेदीखताने जमीन खरेदी केली असल्याने हा मोबदला पमनानी याला देण्यात आला. मात्र आज दुपारच्या सुमाराला सुरोशी यांच्या हरकती नंतर मोबदला थांबविण्यात आला असल्याची प्रतिक्रिया प्रांत अधिकारी नितीन महाजन यांनी दिली.
Bayet- 1 निखील सुरोशी
Bayet_2 प्रांत अधिकारी नितीन महाजन
Conclusion:kalyan
Last Updated : Feb 7, 2020, 11:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.