ठाणे : मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यातच एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी बाधित भूमिपुत्र शेतकऱ्यांनी अनेक महिन्यांपासून कार्यलयात हेलपाटे मारूनही न्याय मिळत नसल्याने कल्याण तालुक्यातील २७ गावातील भूमिपुत्रांनी एमएमआरडीएच्या कार्यप्रणालीचा निषेध ( farmers protest against MMRDA ) केला. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्याचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या मतदार संघातच भूमिपुत्रांवर अन्याय होत ( Criticize MMRDA functioning ) आहे. शिवाय एमएमआरडीए विभागाच्या मंत्रिपदाचा कार्यभार स्वतः मुख्यमंत्री शिंदेंकडे असून शेतकऱ्याबाबत अश्या घटना घडतच असल्याने एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांविरोधात भूमिपुत्रांनी एल्गार पुकारला आहे.
११ महिन्यापासून कार्यलयाचे हेलपाटे : एमएमआरडीएच्या वेळकाढू धोरणामुळे एकीकडे कल्याण तालुक्यातील २७ गावांत अनधिकृत बांधकामे मोठ्या संख्येने वाढली ( Unauthorized construction increased in thane ) आहे. तर दुसरीकडे अधिकृत इमारत बांधणाऱ्या भूमिपुत्रांना गेली ११ महिन्यांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत एमएमआरडीएचे आयुक्त भेट घेण्यासाठी वेळ देत नसून आमची शेत जमिन एमएमआरडीएने विविध विकास कामाच्या नावाखाली आरक्षण टाकून घेतली. मात्र त्या मोबदल्यात एफएसआय मिळण्यासाठी अधिकारी वर्ग सहकार्य करीत नाही. यामुळे गेल्या ११ महिन्यापासून त्यांच्या कार्यलयाचे हेलपाटे मारावे लागत असल्याचा आरोप विक्रम पाटील या भूमिपुत्राने केला आहे.
ग्रोथ सेंटरसाठी जमीन : एमएमआरडीएची परवानगी घेऊन शेतकरी विक्रम पाटील यांनी कल्याण तालुक्यातील कोळेगाव येथे इमारत उभारली असून हि अधिकृत इमारत बांधण्यासाठी पाटील गेल्या १० वर्षांपासून प्रयत्न करत आहे. हि इमारत बांधतांना एमएमआरडीएने विक्रम पाटील यांची सुमारे ४ गुंठे शेत जमीन ग्रोथ सेंटर उभारणी साठी घेतली आहे. याचा मोबदला म्हणून एफएसआय मिळण्यासाठी गेल्या ११ महिन्यांपासून एमएमआरडीएकडे पाठपुरावा करत आहे. मात्र अद्यापही एमएमआरडीएने त्यांना न्याय दिला नाही. विक्रम पाटील यांची ५ मजली इमारत बांधून तयार असून सात मजली इमारतीसाठी केडीएमसी अग्निशमन दलाने नाहरकत दाखला दिला आहे. असे असतांना एमएमआरडीएने एफएसआय न दिल्याने येथील भूमिपुत्रांनी अनधिकृत बांधकामेच करायची का असा सवाल उपस्थित केला आहे.
न्यायालयात दाद मागणार : या सर्व प्रकाराबाबत एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवासान यांची भेट घेण्यासाठी सप्टेंबर महिन्यापासून वेळ मागत असून देखील अद्यापही त्यांनी वेळ न दिल्याने फक्त व्हीआयपी लोकांना हे आयुक्त भेटतात का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. लवकरात लवकर एफएसआय न मिळाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचे विक्रम पाटील यांनी सांगितले. याबाबात एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवासान यांच्याशी संपर्क साधला असता, मिटिंगमध्ये व्यस्त असल्याने संपर्क होऊ शकला नाही.