ETV Bharat / state

म्हैस आणि रेड्याच्या चरबीपासून तूप बनविणाऱ्या कारखान्यावर छापेमारी - तुपाचे १५ डब्बे जप्त

Fake Ghee Seized : भिवंडी महापालिका प्रशासनाने (Bhiwandi MC raid) मृत जनावरांची चरबी वितळवून तूप बनविणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून 250 किलो बनावट तूप जप्त केले आहेत. बनावट तूप कारखाना चालविणाऱ्यां विरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

Fake Ghee Seized
बनावटी तूप जप्त
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 3, 2024, 4:12 PM IST

बनावटी तूप कारखान्यावरील कारवाईविषयी सहाय्यक आयुक्तांची प्रतिक्रिया

ठाणे Fake Ghee Seized : भिवंडी महापालिकेच्या प्रभाग समिती क्र. ४ अंतर्गत येणाऱ्या पालिकेच्या बंद पडलेल्या कत्तलखान्यात जनावरांची चरबी वितळवून तूप तयार करणारे रॅकेट गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत होते. (environment dept action) या संदर्भात अनेक जागरूक नागरिकांनी पालिका प्रशासक आणि आयुक्त अजय वैद्य यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी पर्यावरण विभागाचे नियंत्रण अधिकारी सुदाम जाधव यांनी कत्तलखान्याला भेट देऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुषंगाने नियंत्रण अधिकारी सुदाम जाधव, करआकारणी विभागाचे अधिकारी अधीक्षक सायरा अन्सारी यांच्यासह पालिकेच्या सुरक्षा आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या पथकाने ईदगाहच्या कत्तलखान्याच्या मागे खाडीच्या किनाऱ्यावर असलेल्या तूप कारखान्यावर मंगळवारी २ डिसेंबर रोजी छापा टाकला. यावेळी मृत जनावरांच्या वितळलेल्या चरबीपासून तयार केलेल्या तुपाने भरलेले १५ डबे आढळले. त्यावेळी पालिकेने कारवाई सुरू केली असता रॅकेटमध्ये सहभागी लोकांनी खाडीत उडी मारून पळ काढला.

कारवाई करण्यास पोलीसही घाबरायचे : घटनास्थळावरून पालिका कर्मचाऱ्यांनी ५ मोठ्या लोखंडी कढई, शिवाय चरबीपासून बनवलेले २५० किलो तुपाचे १५ डबे जप्त केले आहेत. भिवंडी पालिकेच्या मालकीच्या कत्तलखान्यावर गेल्या अनेक दशकांपासून विशिष्ट रॅकेटचा ताबा आहे. या बंद कत्तलखान्यात बेकायदेशीरपणे कत्तल केलेल्या जनावरांची कातडी गोळा करून ठेवली जाते. याशिवाय शहराच्या कानाकोपऱ्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या छोट्या-छोट्या कत्तलखान्यांमध्ये कत्तल केलेल्या जनावरांची चरबी आणून कारखान्यात वितळवली जाते. या अवैध धंद्यावर कारवाई करण्यास पोलीसही घाबरत होते; मात्र प्राण्यांची चरबी वितळवून तूप बनविणाऱ्या कारखान्यावर पालिकेच्या पर्यावरण विभागाचे नियंत्रण अधिकारी सुदाम जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच करण्यात आलेली कारवाई शहरात चर्चेचा विषय बनली आहे.

बनावट तुपाची हॉटेल व्यावसायिकांना विक्री : बनावट तूप बनवून ते शहरातील छोट्या-मोठ्या खानावळी, हॉटेल व्यवसायिक यांना विक्री केली जायची. या बाबतच्या तक्रारी वाढल्यानंतर आयुक्तांच्या आदेशाने पर्यावरण विभागाचे नियंत्रण अधिकारी सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव यांनी पालिका आपत्कालीन विभागाच्या पथकासह घटनास्थळी छापा मारून तेथून मोठ्या प्रमाणावर बनावट तुपाचे डबे, तूप बनवण्याचे साहित्य जप्त केले आहे.

हेही वाचा:

  1. 'काकू'ला पकडण्यासाठी नदीत दगड मातीचं छोटं धरण, मेळघाटात आदिवासी महिलांची मासेमारीची अनोखी पद्धत
  2. अदानी हिंडेनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून अदानी ग्रुपला मोठा दिलासा, 'हा' दिला निर्णय
  3. छत्रपती संभाजीनगरमध्ये 'इसिस' समर्थकांची बैठक? अकरा जणांना युपी एटीएसनं बजावली नोटीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.