ETV Bharat / state

जितेंद्र आव्हाड यांचे बनावट फेसबुक अकाऊंट बनवणारा युवक ताब्यात!

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून त्यातून शिवीगाळ करणाऱ्या युवकाला अटक करण्यात आली आहे. आव्हाड व त्यांच्या कुटुंबियांचे फोटो या बनावट फेसबुक अकाऊंटवर प्रसारित करण्यात आले होते.

ठाणे जितेंद्र आव्हाड न्यूज
jitendra avhad news
author img

By

Published : Dec 22, 2020, 12:51 PM IST

ठाणे - राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून त्यातून शिवीगाळ करणाऱ्या युवकाला अटक करण्यात आली आहे. आव्हाड यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांचे फोटो फेसबुकवर प्रसारित करणाऱ्या सुनील रायभान पवार उर्फ सुनील राजे पवार याला औरंगाबादमधून ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याचा मोबाइलही जप्त केला आहे.
घटना काय होती?

८ एप्रिल रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला होता. बनावट फेसबुक अकाऊंटच्या डीपीवर आव्हाड यांच्या कुटुंबाचा फोटो ठेवण्यात आला होता. या अकाउंटद्वारे अश्लील आणि शिवीगाळ असलेला मजकूर तसेच आव्हाड यांचे कौटुंबिक, वैयक्तिक फोटो प्रसारित करण्यात आले होते. या प्रकरणी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सायबर सेलचे पोलीस उपायुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण वाघ, पोलीस नाईक अनुरोध गावित, कॉन्स्टेबल विजय अमर खरटमल, रवींद्र घोडके, गंगाधर तीर्थंकर, राजकुमार राठोड आणि सुजीतकुमार तायडे आदींच्या पथकाने १८ डिसेंबर रोजी औरंगाबाद क्रांतीनगर सिडको येथून सुनील याला अटक केली. आता न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी केली आहे.

हेही वाचा - ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांना पाठवले विलगीकरणात; नागरिकांमध्ये असंतोष..

हेही वाचा - मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशी महिला अंमली पदार्थ तस्कराला अटक
फेसबुकवरील टीका आणि मारहाण
या आधी देखील जितेंद्र आव्हाड यांच्या नावाचे खोटे फेसबुक खाते उघडल्याचे समोर आले असून या अकाउंटवरुन त्यांच्यावर अश्लील टीकाही करण्यात आली होती. या संदर्भात अनेक गुन्हे देखील दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांवर टीका केल्यावर ठाण्यात एका युवकाला गंभीर मारहाण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर आणि त्याच्या सुरक्षारक्षकांवर गुन्हा देखील दाखल झाला होता. तेव्हा या बाबतीत आव्हाड यांनी गुन्हा दाखल केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.