ठाणे : 'ओएलएक्स'वर गाडी विकण्याच्या बहाण्याने एका तोतया आर्मीच्या जवानाने टेलरिंगचा व्यवसाय ( Incident has Come to Light That Fake Army Soldier Cheated ) करणाऱ्याला (टेलर) ऑनलाईन गंडा घातल्याची घटना ( Tailor Online on Pretext of Selling Car on OLX ) उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात ( Case was Registered Against Fake Army Jawan ) तोतया आर्मीच्या जवानासह त्याच्या २ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात ( OLX App to Get a Vehicle at Low Price ) आला. ( Fake Army Man Cheated Taylor on OLX ) रंजित सिंग (रा. चंदेली, वाराणसी ) असे गुन्हा दाखल झालेल्या तोतया आर्मीच्या जवानाचे नाव आहे.
अरविंद कुमार शामलाल बिंद यांनी केली तक्रार : तक्रारदार अरविंद कुमार शामलाल बिंद (वय ३२) हे कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात राहत असून, त्यांचा याच परिसरात टेलरिंगचा व्यवसाय आहे. काही दिवसांपासून त्यांची वाहन घेण्याची इच्छा होती. त्यामुळे कमी किमतीत वाहन मिळविण्यासाठी 'ओएलएक्स' अॅपवर शोध घेत होते. त्याच दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये राहणारा आरोपी रंजित सिंगने 'ओएलएक्स' अॅपवर गाडीचा फोटोसह माहिती देऊन त्या गाडीची किंमत ठरवून ही माहिती अपलोड केली.
आरोपीने आर्मीत असल्याची थाप मारून अरविंदचा विश्वास संपादन : हीच 'ओएलएक्स' अॅपवर माहिती पाहून तक्रारदार अरविंदने आरोपीशी नोव्हेंबर महिन्यात मोबाईलवर संर्पक करून गाडी खरेदीसाठी बोलणी केली. विशेष म्हणजे गाडीचा व्यवहार ठरवताना आरोपीने आर्मीत असल्याची थाप मारून तक्रारदार अरविंदचा विश्वास संपादन केला. त्यानंतर २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यत गाडी खरेदीच्या नावाने अरविंदकडून आरोपीसह त्याच्या दोन साथीदारांनी ऑनलाईन १ लाख ३४ हजार रुपयांची रक्कम घेतली.
गाडीची ठरलेली रक्कम देऊनही आरोपींनी गाडी देण्यास केली टाळाटाळ : गाडीची ठरलेली रक्कम देऊनही आरोपींनी गाडी देण्यास टाळाटाळ केली. शिवाय त्यानंतर मोबाईलही बंद केला. त्यामुळे अरविंदला फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुख्यआरोपीसह त्याच्या दोन साथीदारांविरोधात भादंवि कलम ४२०, ३४, सह सायबर कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख करीत आहेत.