ETV Bharat / state

Farmhouse Electricity Theft: मालक लाखोंच्या फार्महाऊसचे, काम वीजचोरीचे; वाचा या आलिशान चोरट्यांचा कारनामा... - ठाणे फार्महाऊस वीजचोरी

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील निर्सगरम्य भागात काही धनदांडग्यांनी लाखोंचा खर्च करून प्रशस्त फार्महाऊस उभारले. मात्र, मुरबाड तालुक्यातील महावितरण कंपनीच्या उपविभागातील विशेष पथकाने यातील काही फार्महाऊसवर छापेमारी करत लाखो रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली. पथकाने एकाच दिवसात ९ फार्महाऊसवर छापेमारी करत ३० लाख ४६ हजाराची वीजचोरी पकडली.

Farmhouse Electricity Theft
वीजचोरी
author img

By

Published : May 27, 2023, 7:53 PM IST

ठाणे: फार्महाऊसवर मोठ्या प्रमाणात वीजचोरी होत असल्याचा संशय महावितरणला होता. या आधारे २६ मे रोजी मुरबाड उपविभागात विशेष पथकाने शोध मोहीम राबवत ९ फार्महाऊसवर अचानक छापेमारी केली. धक्कादायक बाब म्हणजे, या सर्वच फार्महाऊसवर विनामीटर थेट वीजचोरी होत असल्याचे आढळून आले.

'ही' आहेत चोरटी फार्महाऊस: वीजचोऱ्या शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कल्याण मंडल-1 कार्यालयाच्या विशेष पथकाने मुरबाड उपविभागात २० फार्महाऊसच्या वीज पुरवठ्याची तपासणी केली. यात ९ फार्महाऊसकडून ३० लाख ४६ हजार रुपये किंमतीची ५२ हजार ४२९ युनिट विजेची चोरी आढळून आली आहे. यामध्ये चिराड येथील निसर्ग रेसॉर्ट, जोंधळे फार्महाऊस, मनोज पाटील फार्महाऊस, पंढरीनाथ गायकर फार्महाऊस, मुरबाड येथील ओंकार फार्महाऊस, शिरावली येथील अम्मा फार्महाऊस, लाके वूड फार्महाऊस, गवाली येथील समर्थ म्हात्रे फार्महाऊस, न्हावे येथील डॅडी भोईर फार्महाऊस या नऊ फार्महाऊसमध्ये विजेचा चोरटा वापर आढळून आला आहे.

गुन्हे दाखल होणार: चोरीच्या विजेचे देयक आणि तडजोडीची रक्कम भरण्याबाबत संबंधित फार्महाऊस मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. विहित मुदतीत रकमेचा भरणा न केल्यास त्यांच्यावर वीजचोरीचे गुन्हे दाखल केले जाऊ शकतात. यासंबंधी मुरबाड पोलीस ठाण्यात दाखल होण्यासाठी फिर्याद देण्यात येणार असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता जयश्री भोईर, यांनी दिली आहे. मात्र, वीजचोरीची अचानक छापेमारी करत धडक कारवाई केल्याने मुरबाड तालुक्यातील वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.

'या' पथकाने केली धडक कारवाई: कल्याण परिमंडलाचे महावितरणचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर आणि कल्याण मंडल एकचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता जयश्री भोईर, सहायक अभियंते सुरज माकोडे, जयश्री कुरकुरे, दीपाली जावले, कर्मचारी किशोर राठोड, राजेंद्र जानकर, संतोष मलाये, विनोद गिलबिले, नितीन कुवर, आकाश गिरी, मधुकर चन्ने, सुभाष डोरे, संकेत मुर्तरकर यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे.

हेही वाचा:

  1. Union Bank: युनियन बँकेला 260 कोटींचा गंडा; सीबीआयकडून दुसरा गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.