ETV Bharat / state

रात्रीच्या अंधारात भातशेतीच्या बांधावरून पालकमंत्र्यांनी दिला विमा कंपन्यांना इशारा

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी चक्क रात्रीच्या अंधारात भातपिकांच्या नुकसानी पाहणी दौरा केला. यावेळी जर विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना धावपळ करायला लावली की त्यांना सरळ करू असा इशारा त्यांनी दिला.

भेट देताना पालकमंत्री एकनाथ शिंदे
author img

By

Published : Nov 7, 2019, 2:37 PM IST

ठाणे - ठाण्याचे पालकमंत्री यांचा निजोजित दौरा काल (बुधवार) दुपारचा होता. मात्र, मुख्यमंत्री पदावरून सेना-भाजपमध्ये रंगलेल्या कलगीतुऱ्यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी चक्क रात्रीच्या अंधारात भातपिकांच्या नुकसानी पाहणी दौरा केला. यावेळी शेतकऱ्यांना नुकसानीचा विमा लवकरात लवकर द्या, अन्यथा बंदोबस्त करण्यात येईल, असा इशारावजा दमच भातशेतीच्या बांधावरून पालकमंत्र्यानी विमा कंपन्याला दिला.

बोलताना ठाण्याचे पालकमंत्री शिंदे

परतीच्या व अवकाळी पावसाने शेतात पिकून तयार झालेल्या पिकाचे अतोनात नुकसान झाले असून त्याची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी सायंकाळी उशिरा भिवंडी तालुक्यातील तलवली या गावातील शेतांना भेट दिली. शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करीत त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरामण सोनवणे, आमदार शांताराम मोरे, हातमाग महामंडळ अध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा दिपाली पाटील, सभापती वैशाली चंदे, उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर, तहसीलदार शशिकांत गायकवाड, ग्रामपंचायत सरपंच अपर्णा लोणे यांसह असंख्य शेतकरी उपस्थित होते.

दरम्यान, शेतकऱ्यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या समोर आपल्या व्यथा मांडत असताना सन 2017 - 18 मधील तुटपुंजी सरकारी मदत ही आपणास मिळाली नसल्याची तक्रार केली. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी तहसीलदारांसह अधिकारी वर्गाची कानउघाडणी केली. तर शेतकऱ्याना जास्तीत जास्त मदत मिळाली पाहिजे यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः आग्रही आहोत. आम्ही मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून हेक्टरी 25 हजार रुपये देण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यातील 50 टक्केहून अधिक शेतीचे नुकसान झाले असल्याने पिकविम्याचा फायदा त्यांना मिळावा. त्यासाठी विमा कंपन्यांनी अवाजवी कागदपत्रांची अपेक्षा न धरता सरकारी पंचनामे ग्राह्य धरून मदत करावी, अन्यथा त्यांना आम्ही सरळ करू, असा इशारा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे .

Intro:kit 319Body:रात्रीच्या अंधारात भातशेतीच्या बांधावरून पालकमंत्र्यांनी दिला विमा कंपन्याला इशारा

ठाणे :- ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांचा निजोजित दौरा दुपारचा होता. मात्र मुख्यमंत्री पदावरून सेना - भाजपमध्ये रंगलेल्या गलगीतुऱ्यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी चक्क रात्रीच्या अंधारात भातपिकांच्या नुकसानी पाहणी दौरा केला. यावेळी शेतकऱ्यांना नुकसानीचा विमा लवकरात लवकर द्या अन्यथा शिवसेना स्टाईलने विमा कंपन्यांचा बंदोबस्त केला जाईल असा इशारा वजा दमच भातशेतीच्या बांधावरून पालकमंत्र्यानी विमा कंपन्याला दिला.

परतीच्या व अवकाळी पावसाने शेतात पिकून तयार झालेले पिकाचे अतोनात नुकसान झाले असून त्याची पाहणी करण्या करीता पालकमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी सायंकाळी उशिरा भिवंडी तालुक्यातील तलवली या गावातील शेतात जाऊन शेतक-याच्या नुकसानीची पाहणी करीत शेतक-याना दिलासा देण्याचा प्रयत्न केला . या प्रसंगी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर , मुख्य कार्यकारी अधिकारी हिरामण सोनवणे ,आमदार शांताराम मोरे ,हातमाग महामंडळ अध्यक्ष प्रकाश पाटील ,जिल्हा परिषद अध्यक्षा दिपाली पाटील ,सभापती वैशाली चंदे ,उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर ,तहसीलदार शशिकांत गायकवाड ,जिल्हा परिषद ,पंचायत समिती सदस्य ,ग्रामपंचायत सरपंच अपर्णा लोणे यांसह असंख्य शेतकरी उपस्थित होते .

दरम्यान, शेतक-यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या समोर आपल्या व्यथा मांडत असताना सन 2017 - 18 मधील तुटपुंजी सरकारी मदत ही आपणास मिळाली नसल्याची तक्रार केली असता एकनाथ शिंदे यांनी तहसीलदारांसह अधिकारी वर्गाची कानउघाडणी केली. तर शेतक-याना जास्तीत जास्त मदत मिळाली पाहिजे यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः आग्रही असून आम्ही मंत्रिमंडळ बैठकीत शेतक-यांना तातडीची मदत म्हणून हेक्टरी 25 हजार रुपये देण्याची मागणी केली असून जिल्ह्यातील 50 टक्केहून अधिक शेतीचे नुकसान झाले असल्याने पिकविम्याचा फायदा त्यांना मिळावा त्यासाठी विमा कंपन्यांनी अवाजवी कागदपत्रांची अपेक्षा न धरता सरकारी पंचनामे ग्राह्य धरून मदत करावी अन्यथा त्यांना ही आम्ही सरळ करू असा इशारा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे .

Byte :- एकनाथ शिंदे ( पालकमंत्री - ठाणे जिल्हा )

Conclusion:palkmantri
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.