ठाणे : भिवंडीमध्ये आज पहाटे एक तीनमजली इमारत कोसळली. यामध्ये दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला.
यावेळी बोलताना शिंदेंनी आपत्तीग्रस्तांना सर्व प्रकारची मदत तातडीने उपलब्ध करुन देण्यात यावी अशी सूचना महापालिका, जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला दिल्या. यासोबतच, दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत केली जाईल असे त्यांनी जाहीर केले.
आज पहाटे तीनच्या सुमारास भिवंडीच्या धामणकर नाका, पटेल कंपाउंड परिसरात असलेली एक ३ मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० हून अधिक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफ आणि टीडीआरएफची टीम दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे.
हेही वाचा : 'ती' इमारत धोकादायक होती, पालिकेच्या नोटीसीकडे रहिवाशांचे दुर्लक्ष