ठाणे - यंदा पावसाचा राज्यभर कहर माजला आहे. नवी मुंबईत ऐन दिवाळीच्या सणात जोरदार पाऊस पडत आहे. घराबाहेर पडण्यासाठी पाऊस जराही उसंत देत नसल्याने याचा नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम दिसून येत आहे. वर्षातील सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीला सुरुवात झाली असून, या सणावरही पावसाचे सावट दिसत आहे.
हेही वाचा - 'क्यार' चक्रीवादळ : किनारपट्टीवर अजस्त्र लाटांचे तांडव, मासेमारी ठप्प
बाजारपेठेतील दुकाने दिवाळीच्या सामानांनी भरून गेली आहेत. मात्र, पावसामुळे मुंबईकर घरातच अडकल्याने बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. कपडे, फटाके, सौंदर्य प्रसाधने, आकाशदिवे, रांगोळी, दिवाळीचे फराळ बनविण्यासाठीचे साहित्य घेण्यासाठी दरवर्षी नवी मुंबई परिसरातील बाजारपेठा लोकांनी भरून गेलेल्या असतात. यंदा मात्र गर्दीमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा - हरित फटाके म्हणजे काय रे भाऊ! शिवकाशीच्या कारखान्यातील कामगारच विचारतात प्रश्न