ETV Bharat / state

काळू नदीवरील पूल चौथ्यांदा पुराच्या पाण्याखाली; दहा ते बारा गावांचा संपर्क तुटला

कल्याण तालुक्यातील टिटवाळा नजीक असलेल्या काळू नदीवरील पुल शनिवारी सकाळच्या सुमारास पुराच्या पाण्याखाली गेला. या मार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. त्यामुळे 10 ते 12 गावांचा कल्याण व टिटवाळा शहराशी संपर्क तुटला आहे.

author img

By

Published : Aug 3, 2019, 3:58 PM IST

काळू नदीवरील पूल चौथ्यांदा पुराच्या पाण्याखाली

ठाणे- जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. कल्याण तालुक्यातील टिटवाळा नजीक असलेल्या काळू नदीवरील पुल शनिवारी सकाळच्या सुमारास पुराच्या पाण्याखाली गेला. या मार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. त्यामुळे 10 ते 12 गावांचा कल्याण व टिटवाळा शहराशी संपर्क तुटला आहे. विशेष म्हणजे यंदाच्या पावसाळ्यात हा पूल चौथ्यांदा पुराच्या पाण्याखाली गेला आहे.

काळू नदीवरील पूल चौथ्यांदा पुराच्या पाण्याखाली

जिल्ह्यात मुसळधार कोसळत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वत्र नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मुरबाड व शहापूर तालुक्यातील नदीच्या उगमाच्या ठिकाणी देखील पावसाचा जोर कायम आहे. यामुळे काळू नदीला पूर आला आहे. रुंदे गावाजवळील नदीवरील पुलावरून पुराचे पाणी गेल्याने हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे. हा पूल पाण्याखाली गेल्याने सकाळच्या सुमारास शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल झाले आहेत. यामुळे रुंदे, फळेगाव , आंबिवली, दानबाव, मढ, उशिद, हाळ, पळसोळी, आरोळा, भोंगळपाडा आदि 10 ते 12 गावांचा सकाळपासून कल्याण टिटवाळा शहराशी संपर्क तुटला आहे.विशेष म्हणजे हा रस्ता मुरबाड -नगर महामार्ग तसेच वाशिंद -पडघा मार्गावरून मुंबई-नाशिक या महामार्गाला जोडत आहे.

दहा ते बारा गावातील गावकऱ्यांना पर्यायी रस्ता खडवली मार्गे पंधरा ते वीस किलोमीटर अंतर पार करून आपल्या घरी पोहोचावे लागत आहे. मात्र, ज्यांच्याकडे खाजगी वाहने असतील त्यांनाच या मार्गावर आपल्या घरी पोहोचता येत आहे. तर दुसरीकडे खडवली फळेगाव उशिद या मार्गावर धावणारी एसटी बस सेवा तीन वर्षापासून बंद आहे. यामुळे या परिसराच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना पुराचे पाणी ओसरेपर्यंत पुलाच्या एका कोपऱ्याला उभे राहून वाट पहावी लागत आहे.

Intro:किट नंबर 319

Body:काळू नदीवर पूल चौथ्यांदा पुराच्या पाण्याखाली; दहा ते बारा गावाचा संपर्क तुटला

ठाणे : शुक्रवारी सायंकाळपासून मुसळधार बरसात असलेल्या पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे तर दुसरीकडे कल्याण तालुक्यातील टिटवाळा नजीक असलेल्या काळू नदीवरील पुल आज सकाळच्या सुमारास पुराच्या पाण्याखाली गेला आहे यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णता ठप्प होऊन 10 ते 12 गावांचा कल्याण व टिटवाळा शहराशी संपर्क तुटला आहे,
विशेष म्हणजे यंदाच्या पावसाळ्यात हा पूल चौथ्यांदा पुराच्या पाण्याखाली गेला आहे, शनिवारी देखील हा पूल पुराच्या पाण्याखाली गेल्याने यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे,
जिल्ह्यात मुसळधार कोसळत असलेल्या पावसाने पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत केले असून सर्वत्र नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे, मुरबाड व शहापूर तालुक्यातील नदीच्या उगमाच्या ठिकाणी देखील पावसाचा जोर कायम आहे, यामुळे काळू नदीला पूर आला आणि रुंदी गावाजवळील नदीवरील पुलावरून पावसाचे पुराचे पाणी गेल्याने हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे , हा पूल पाण्याखाली गेल्याने सकाळच्या सुमारास शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल झाले आहेत , यामुळे रुंदे, फळेगाव , आंबिवली, दानबाव, मढ, उशिद, हाळ, पळसोळी, आरोळा, भोंगळपाडा आदि 10 ते 12 गावांचा सकाळपासून कल्याण टिटवाळा शहराशी संपर्क तुटला आहे,
विशेष म्हणजे हा रस्ता मुरबाड -नगर महामार्ग तसेच वाशिंद -पडघा मार्गावरून मुंबई-नाशिक या महामार्गाला जोडत आहे,
धर्म हा पूल पाण्याखाली गेल्याने दहा ते बारा गावातील गावकऱ्यांना पर्यायी रस्ता खडवली मार्गे पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर पार करून आपल्या घरी पोहोचावे लागत आहे, मात्र ज्यांच्याकडे खाजगी वाहने असतील त्यांनाच या मार्गावर आपल्या घरी पोहोचता येईल तर दुसरीकडे खडवली फळेगाव उशिद या मार्गावर धावणारी एसटी बस सेवा तीन वर्षापासून बंद पडलेली आहे यामुळे या परिसराच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना पुराचे पाणी ओसरण्याची वाट पाहत पुलाच्या एका कोपऱ्याला उभे राहून वाट पहावी लागत आहे,
(व्हिजवल, फोटो, व्हाट्सएपवर टाकले आहेत )

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.