ETV Bharat / state

Thane Rainfall : जिल्ह्यात सरासरीच्या १०६ टक्के पाऊस; खरीपाची सुमारे ८७ टक्के लागवड

ठाणे जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरी १०६ टक्के ( 106 percent Rain in Thane ) पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत 87 टक्के खरीपाची लागवड केल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षकांनी दिली आहे. तर अंबरनाथ तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

ठाणे पाऊस
ठाणे पाऊस
author img

By

Published : Jul 29, 2022, 4:10 PM IST

ठाणे - जिल्ह्यामध्ये २८ जुलैपर्यंत सरासरीच्या १०६ टक्के पाऊस झाला ( 106 percent Rain in Thane ) असून खरीपाची सुमारे ८७ टक्के लागवड झाली आहे. जिल्ह्यात या हंगामासाठी सुमारे १३३ टक्के रासायनिक खतांचा पुरवठा करण्यात आला असून जिल्ह्यात खते, बियाण्यांचा पुरेसा पुरवठा करण्यात आला आहे. विविध योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्यात १७७ शेतीशाळा सुरु असून ५ हजार ३१० शेतकरी बांधवाना प्रशिक्षण दिले जात असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी सांगितले आहे.

सर्वाधिक पाऊस अंबरनाथ तालुक्यात : तालुकानिहाय पावसाचे प्रमाण पाहता ठाणे तालुक्यात ९७ टक्के, कल्याण, ९६ टक्के, मुरबाड ९६.५० टक्के, भिवंडी १०६.६० टक्के, शहापूर १२६.७० टक्के, उल्हासनगर १२३.७० टक्के तर अंबरनाथ तालुक्यात १५६.८० टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात कालपर्यंत सुमारे १६५३.५० मिलीमीटर पाऊस झाला असून सरासरीच्या १०६.१० टक्के असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

आतापर्यंत जिल्ह्यात ८७ टक्के लागवड : दमदार पाऊस झाल्यान खरीपाची लागवड जवळपास पूर्ण होत आली असून आतापर्यंत जिल्ह्यात ८७ टक्के लागवड झाल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक श्री. वाघ यांनी सांगितले. त्यामध्ये भात ४७ हजार १६९ हेक्टरवर (८५.८८ टक्के) लागवड झाली असून नागली १८२५.५० हेक्टर (७५.८५ टक्के), वरी ९९२.४० हेक्टर (९४ टक्के) तर तूर ४३२७ हेक्टर (१०४.७० टक्के) अशी लागवड झाली आहे.

१३३ टक्के रासायनिक खतांचा पुरवठा : खरीप हंगामासाठी सुमारे १३३ टक्के रासायनिक खतांचा पुरवठा झाला असून खते, बियाण्यांचा पुरेसा पुरवठा करण्यात आला. जिल्ह्यातील ११२ कृषी सेवा केंद्रांतुन खतांची व १२० कृषी सेवा केंद्रांतुन बियाणे विक्री केली जात आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या सेस फंडातून ८०० क्विंटल भात बियाणे शेतकरी बांधवांना ५० टक्के अनुदानावर देण्यात आले आहे. जिल्ह्यातील ५४२ गावामध्ये शेतकरी बांधवानी घरचे नागली व भात बियाणे पेरणीसाठी वापरले असल्याने ३ टक्के मिठाच्या द्रावणाची व जैविकखताची बिजप्रक्रिया करणेचे प्रात्याक्षिके व प्रशिक्षण त्यांना देण्यात आले आहे.

५ हजार ३१० शेतकरी बांधवाना दिले प्रशिक्षण : राष्ट्रीय कृषि विकास योजनेतून जिल्ह्यातील कमी उत्पादकता असलेल्या गावात भातपिकाचे रत्नागिरी ८ वाणाचे प्रमाणीत बियाणेचे भात पिकांचे पिक प्रात्यक्षिके ५८० हे. क्षेत्रावर राबविण्यात येत असून २३२ क्विंटल बियाणे ५० टक्के अनुदानावर पुरवठा करण्यात आले आहे. विविध योजनेंतर्गत जिल्ह्यात १७७ शेतीशाळा सुरु असून ५ हजार ३१० शेतकरी बांधवाना प्रशिक्षण दिले जात आहे. क्रॉपसप योजनेच्या माध्यमातून भात व नागली पिकावरील कीड, रोग इत्यादी सर्वेक्षण सुरु असून शेतकरी बांधवाना किड/रोग नियंत्रणाबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले जात असल्याचे वाघ यांनी सांगितले.

पिक विमा योजनेला चांगला प्रतिसाद : जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी बांधवांचा पिक विमा योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत एकूण ३१ हजार ४४ शेतकऱ्यांनी भात पिकाचा विमा उतरविला आहे. त्यामाध्यमातून १२ हजार ५४३ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत आहे. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी भात पिकाचा विमा काढावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

हेही वाचा - International Tiger Conservation Day: कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय व्याघ्र संवर्धन दिनी वाघांची संख्या ३०० होण्याची अपेक्षा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.