ETV Bharat / state

कोरोनाच्या अफवांविरोधात आयएमए सज्ज; अफवांविरोधी मोहीम सुरू

author img

By

Published : Mar 15, 2020, 4:43 PM IST

सदर मोहीम ही आयएमएने सामाजिक उत्तरदायित्व म्हणून आखलेली आहे. महाराष्ट्रातील जनतेचे आरोग्य सुरक्षित रहावे आणि त्यांच्यात आरोग्य साक्षरता निर्माण व्हावी म्हणून आयएमए कटिबद्ध आहे. सदर मोहीम हा डॉक्टरांच्या सामाजिक जबाबदारीचा एक भाग असल्याचे आयएमएचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी एका पत्रकात म्हटले आहे.

corona virus thane
कोरोना

ठाणे- कोरोना विषाणूने निर्माण झालेल्या साथीमुळे महाराष्ट्रातील जनता चिंतातूर आणि हवालदिल झाली आहे. त्यातच विविध प्रसारमाध्यमातून येणाऱ्या अशास्त्रीय आणि बिनबुडाच्या पोस्ट्समुळे नागरिकांमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होते आहे. त्यामुळे, डोंबिवलीतील इंडियन मेडिकल असोसिएशनने याबाबींची गंभीर दखल घेतली असून राज्यभर अफवाविरोधी मोहीम हाती घेतली आहे.

राज्यातील कोणत्याही गाव-शहरातील व्यक्तीला कोरोना विषाणूबाबत संभ्रमित करणारे, भीती दाखवणारे किंवा तथाकथित शास्त्रीय किंवा पारंपरिक उपाय सुचवणारे संदेश कोणत्याही माध्यमात आढळले तर त्याने हा संदेश अन्य कोणालाही पाठवण्याऐवजी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या +९१९८२३०८७५६१ आणि +९१९१५०४९४८४८ (इंडियन मेडिकल असोसिएशन शाखे) या संपर्क क्रमांकावर कळवावे. अशा संदेशाचे आयएमएमधील तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्वरित विश्लेषण केले जाईल आणि त्याची सत्यता सांगणारा संदेश त्या व्यक्तीला त्वरित उत्तर म्हणून पाठवला जाईल. अशा प्रकारचा संदेश जर खूप गैरसमज आणि भीतीदायक वातावरण पसरवणारा असेल तर सदर संदेश मूलतः पाठवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध सायबर क्राईम अंतर्गत पोलीस तक्रार केली जाईल, असे आयएमएकडून सांगण्यात आले आहे.

कोरोनाबाबत एमआयएची कार्य

एमआयएकडून रुग्णांची तपासणी करून त्यातील कोविड-१९ चे संशयित रुग्ण शोधून काढत आहे. अशा रुग्णांना त्वरित सरकारी हॉस्पिटलमध्ये किंवा सरकारी निदान केंद्रांकडे पुढील तपासणीसाठी पाठवत आहे. जनतेमध्ये कोविड-१९ बाबत आणि प्रतिबंधक उपायांबाबत शास्त्रीय दृष्टिकोनातून जागरूकता निर्माण करत आहे.

हेही वाचा- लोकलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू असल्याचा निनावी फोन, पनवेल स्टेशनसह रेल्वेची तपासणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.