ETV Bharat / state

Dog Stuck In Sewer : बंद गटारात अडकलेल्या 'श्वाना'ची, स्लॅब तोडून सुटका - Dog Rescue By Breaking Slab

बंद गटारात अडकलेल्या श्वानाची सुटका करण्यात अग्निशमन पथकाला यश आले ( Dog Stuck In Sewer ) आहे. श्वानाची गटारातून सुटका करण्यासाठी स्लॅब तोडण्यात आला होता. सुमारे अर्धातास त्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 14, 2022, 2:03 PM IST

बंद गटारात अडकलेल्या श्वानाची सुटका

ठाणे : बंद गटारात अडकून पडललेले श्वान जीवाच्या आकांताने विव्हळत ( Dog Stuck In Sewer ) होते. या श्वानाला अग्निशमन दलाच्या जवानांनी गटरावरील स्लॅब तोडून सुखरूप सुटका केल्याची घटना घडली आहे. ही घटना कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील त्रिशूल अपार्टमेंट लगतच्या गटारात घडली आहे. विशेष म्हणजे अर्धातास अथक प्रयत्नानंतर श्वानाला गटारातून बाहेर काढण्यात जवानांना यश ( Dog Rescue By Breaking Slab ) आले.

स्लॅब तोडून श्वानाची सुटका : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील त्रिशूल अपार्टमेंट लगतच्या गटारात आज दुपारच्या सुमारास श्वान जीवाच्या आकांताने गेली तासभरापासून विव्हळत असल्याचे परिसरात राहणाऱ्या मनसेचे कार्यकर्ते राजे यांनी पाहताच कल्याण पूर्वेतील अग्निशमन दलाच्या कार्यलयात संपर्क करून माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन अधिकारी आंबोकर यांच्यासह एलन डिसोझा, जगदीश पुरळकर आणि फायरमन हरीश खर्डीकर, राकेश चौरे, महेंद्र जाधव, किशोर गवळी हे पथक घटनास्थळी पोहचले. या पथकाने श्वानाला सुखरूप रित्या कसे बाहेर काढता येईल याचे नियोजन करत गटारवरील स्लॅब हातोडा आणि लोखंड कापण्याच्या कैचीने सळई कापल्या होत्या. या पथकाने सुमारे अर्धातास परिश्रम करून या श्वानाला सुखरूप बाहेर काढले. दरम्यान या श्वानाला कुठलीही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले ( Dog Stuck In Sewer Rescued ) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.