ETV Bharat / state

ऐरोलीसह बेलापूर मतदारसंघातील मतदानाच्या घटलेल्या टक्केवारीचा फायदा युतीला?

नवी मुंबईमधील ऐरोली व बेलापूर मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घटल्याचे समोर आले आहे. मतांच्या घटलेल्या टक्केवारीचा फायदा सेना-भाजप युतीला होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ऐरोली मतदारसंघातील मतदानात लक्षणीय घसरण झाली असून २०१४ला ५७.४७ टक्के मतदान झाले होते.

सेना-भाजप
author img

By

Published : Oct 23, 2019, 7:56 PM IST

ठाणे - नवी मुंबईमधील ऐरोली व बेलापूर मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घटल्याचे समोर आले आहे. मतांच्या घटलेल्या टक्केवारीचा फायदा सेना-भाजप युतीला होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ऐरोली मतदारसंघातील मतदानात लक्षणीय घसरण झाली असून २०१४ला ५७.४७ टक्के मतदान झाले होते. मात्र, यावर्षी ४२. ८९ टक्के मतदान झाले. बेलापूर मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत ४९.६६ टक्के मतदान झाले होते. मात्र,या निवडणुकीत ४५.३५ टक्के मतदान झाले.

नवी मुंबईतील नागरिकांध्ये यावर्षी २०१४च्या तुलनेत मतदानासंबधी उदासीनता पाहायला मिळाली. यापूर्वी झालेल्या प्रत्येक निवडणुकांमध्ये तुर्भे, कोपरखैरणे, वाशी,नेरुळ परिसरामध्ये सकाळी सात ते आठच्या दरम्यान मोठ्या रांगा पाहायला मिळायच्या मात्र यावर्षी पूर्ण चित्र पालटले होते. सुरवातीच्या दोन तासात फक्त 4 टक्के मतदान पार पडल्याची नोंद करण्यात आली होती. कमी मतदानाची नोंद होतेय हे पाहून उमेदवार व कार्यकर्त्यांनी शक्य असेल त्या माध्यमातून मतदानाचे आवाहन करण्यास सुरुवात केली. काही ठिकाणी मतदारांसाठी राजकीय पक्षांच्या माध्यमातून वाहनांची सोय करण्यात आली. दुपारनंतर मतदान करण्यासाठी नागरिकांची संख्या वाढू लागली.

मतदानावेळी काही ठिकाणी शाब्दिक चकमकी पाहायला मिळाल्या तर मतदान केंद्रात वीज जाणे, चुकीचे फोटो लागणे यामुळे मात्र चांगलीच त्रेधातिरपीट उडाली.मात्र, दोन्ही मतदार संघात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही व मतदान शांततेत पार पडले.

राजकीय पक्षात एकनिष्ठा राहिली नाही कोणत्याही पक्षाचा आदर्श राहिला नाही, शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीत असलेले सगळे भाजपमध्ये गेले भाजपनेही त्यांना स्वीकारलं. आपण व्यक्तीला मतदान करावे, पक्षाला मतदान करावे की तत्वाला करावे? यामुळे नागरीक संभ्रमात राहिले, याचा परिणाम मतांच्या टक्केवारीवर झाला असे मत ज्येष्ठ पत्रकार विश्वरथ नायर यांनी म्हटले. नवी मुंबईतील नागरिकांचे प्रश्न वर्षोनुवर्षे सुटले नाहीत, प्रकल्पग्रस्त, सिडको वसाहतीत राहणारे नागरिक, झोपडपट्टीत राहणारे नागरिक यांच्या घरांचे प्रश्न अजूनही सुटले नाहीत, त्यामुळे मतदारांमध्ये नैराश्याची भावना होती. आपलं काहीच राहील नाही असंही लोकांना वाटत आहे. नवी मुंबई कॉसमापॉलिटीन शहर आहे, त्यामुळे इथं लोक रोजीरोटीच्या मागे लागले आहेत. त्यांना या मतदानाच्या प्रक्रियेत रस दिसत नाही. त्याचाही परिणाम कमी मतदानावर झाला आहे. मतदानाची टक्केवारी वाढली नाही कमी मतदान झालं याचा फायदा नक्कीच सेना भाजप युतीला होईल, असे देखील विश्वरथ नायर यांनी सांगितले.

मतदान कमी होण्याची कारणे -

नवी मुंबईतील स्थानिक ग्रामस्थांची नाराजी, गावठाण विस्तार व आहे ती घरे बांधण्यासंबधी लादल्या जाणाऱ्या जाचक अटी, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून याबाबत कोणत्याही प्रकारे ठोस पाऊल न उचलणे. यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी मतदानाकडे पाठ फिरवली.
सिडको वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांच्या २.५ वाढीव घरासंबंधीच्या जाचक अटी व लोकप्रतिनिधी यांची उदासीनता, दरवेळी निवडणुकीच्या दरम्यान तीच तीच दिली जाणारी आश्वासने मात्र त्याची कधीही न होणारी पूर्तता, दिवाळीची सुट्टी, नवी मुंबईतील मतदारांचे गावी मतदान आणि नव-मतदात्यांची यादीत नावांची नोंद न होणे या कारणांमुळे मताची टक्केवारी कमी झाली.

Intro:२०१४ च्या विधानसभा निवडणूकीच्या तुलनेत जिल्ह्यात २.०७ टक्क्यांनी मतदान घसरलेBody:
आहे . गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ४ लाख १ हजार ६२३ मतदार वाढले असले तरी मतदान मात्र ५२ हजार ७०९ मतदारांनी कमी केले असल्याचे उघड झाले आह. जिल्ह्यात बहुतांशी मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला असला तरी भिवंडी पश्चिम , भिवंडी पूर्व , अंबरनाथ , उल्हासनगर, या मतदारसंघात मात्र मतदान वाढले असून या घटलेल्या आणि वाढलेल्या मतांचा फायदा कोणाला आणि फटाका कोणाला बसणार याचा फैसला आज दुपारपर्यंत होणार आहे.
भिवंडी ग्रामीण मतदारसंघात २०१४ च्या तुलनेत ६. ६४ टक्के मतदान कमी झाले आहे .या ठिकाणी शिवसेनेचे विद्यमान आमदार शांताराम मोरे , राष्ट्रवादीच्या मधुरा म्हात्रे आणि मनसेच्या शुभांगी गोवारी यांच्यात तिरंगी सामना आहे.भिवंडी पूर्वेत ३.५१ टक्के मतं वाढली आहेत.येथे शिवसेनेचे रूपेश म्हात्रे आणि काँग्रेसचे संतोष शेट्टी यांच्यात थेट लढत आहे .मुरबाड मतदारसंघात यंदा ४. ८१ टक्के मतदान कमी आहे.भाजपचे किसन कथोरे,राष्ट्रवादीचे प्रमोद हिंदुराव यांच्यात सामना आहे.
कल्याण ग्रामीण मतदारसंघात १.५७ टक्के मतदान कमी झाले आहे.शिवसेनेने विद्यमान आमदार सुभाष भोईर यांचे तिकीट कापून रमेश म्हात्रे याना उमेदवारी दिली आहे तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने मनसेचे प्रमोद उर्फ राजू पाटील याना पाठिंबा दिला असल्याने या ठिकाणची लढत रंगतदार होणार आहे.मिराभाईंदर मतदारंघात ४.२५ टक्के मतदान कमी झाले आहे भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र मेहता आणि काँग्रेसचे माजी आमदार मुझफर हुसेन यांच्यात लढत असली तरी भाजपच्या माजी महापौर गीता जैन यांनी बंडखोरी केल्याने चुरस वाढली आहे.
ठाण्याच्या ओवळा माजिवडा ७. ३४ टक्के मतदान कमी झाले आहे.शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक, आणि काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांच्यात मुख्य लढत असून मनसेचे संदीप पाचंगे हेही मैदानात आहेत .मुंब्रा कळवा मतदारसंघात २.४८ मतं वाढली असून या मतदारसंघात राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात शेवटच्या क्षणी चित्रपट अभिनेत्री दीपाली सय्यद याना शिवसेनेने मैदानात उतरवले असल्याने रंगत वाढली आहे.नवी मुंबईच्या ऐरोली मतदारसंघात ८. ९६ टक्के मत कमी झाली आहेत.या ठिकाणी राष्ट्रवादीतून भाजपात गेलेलं माजी मंत्री गणेश नाईक मैदानात उतरले आहेत तर बेलापूर मतदारसंघात ४.५३ टक्के मतं कमी झाली असताना भाजपच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे याना राष्ट्रवादीचे अशोक गावडे , मनसेचे गजानन काळे आणि शिवसेना बंडखोर विजय माने यांनी आव्हान दिले आहे.
* भिवंडी - उल्हासनगर पट्ट्यात मतदान वाढले
जिल्ह्यातील बहुतांशी मतदारसंघात मतदान कमी झाले असताना भिवंडी पूर्व मतदारसंघात ३.५१ टक्के , भिवंडी पश्चिम मतदारसंघात १. ६४ टक्के , अंबरनाथ मतदारसंघात २.६१ टक्के आणि उल्हासनगर मतदारसंघात सर्वाधिक ८.६७ टक्के मतदान वाढले आहे.
Byte मिलिंद बल्लाळ जेष्ठ पत्रकार
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.