ETV Bharat / state

बादलीत बुडलेल्या एक वर्षाच्या बाळाला वाचवण्यात डॉक्टरांना यश - ठाणे शहर बातमी

बादलीत पडलेल्या वेशुद्धावस्थेतील बाळाला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील बालरोग विभागाच्या डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून वाचविले आहे.

चिमुकलीसह बालरोगतज्ज्ञ
चिमुकलीसह बालरोगतज्ज्ञ
author img

By

Published : Oct 29, 2020, 8:42 PM IST

ठाणे - दिव्या उमाशंकर यादव ही एक वर्षाची चिमुकली पाण्याच्या बादलीत पडून बेशुद्ध झाली होती. तिच्यावर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तत्काळ उपचार करून तिचे प्राण वाचवण्यास बालरोग विभागाच्या डॉक्टरांना यश मिळाले आहे.

मंगळवारी (दि. 27 ऑक्टोबर) ठाण्यातील वाघोबा नगर, कळवा येथील चाळीत राहणारे दिव्या उमाशंकर यादव ही चिमुकली खेळत असताना पाण्याचा बादलीत पडली. तिच्या नाकातोंडात पाणी जाऊन ती बेशुद्ध झाली. तिच्या आई-वडिलांनी तिला खासगी रुग्णालयात नेले असता रुग्णालयाने दाखल करण्यास नकार देत तिला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यास सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात बाळाला आणताच बालरोग विभागाच्या डॉक्टरांनी बाळाला तपासून तत्काळ रुग्णालयामध्ये दाखल करून घेतले. भरती करताना बाळ बेशुद्धावस्थेत होते. तिचे शरीर थंड पडले होते. बाळाला आकडी येऊन रक्तदाबही कमी झाला होता.

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील बालरोग विभागाच्या डॉक्टरांनी बाळाच्या आकडीवर तत्काळ उपचार सुरू करून फुफ्फुसातील पाणी काढले. बाळाला ऑक्सिजन लावून तब्बेत स्थिर केली आहे. आता बाळाची प्रकृती स्थिर आहे.

हेही वाचा - 'बिल्डर'च्या सांगण्यावरून राकेश पाटलांची निर्घृण हत्या केल्याचा मनसे जिल्हाध्यक्षांचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.