ETV Bharat / state

Thane Crime : भर रस्त्यात हल्लेखोरांकडून प्राणघातक हल्ला, डॉक्टर गंभीर जखमी

एका वयोवृद्ध डॉक्टरवर भर रस्त्यात हल्लेखोराकडून लोखंडी हातोडीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी शहरातील वंजारपट्टी भागातील मुख्य रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी हल्लेखोरावर निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे.

Thane Crime
वयोवृद्ध डॉक्टरवर भर रस्त्यात प्राणघातक हल्ला
author img

By

Published : Mar 28, 2023, 4:55 PM IST

Updated : Mar 28, 2023, 9:33 PM IST

वयोवृद्ध डॉक्टरवर भर रस्त्यात प्राणघातक हल्ला

ठाणे : येथील निजामपुरा भागात एक घटना समोर आली आहे. जी माणूकीला काळीमा फासणारी आहे. भर रस्त्यात लोखंडी हातोड्याने डॉक्टरवर प्राणघातक हल्ला केल्याची ही घटना आहे. अताउल्लाह सकरुल्लाह अन्सारी (वय ५५) असे अटक हल्लेखोराचे नाव आहे. तर, कपिल अहमद झाहीरुऊद्दीन फारुखी ( वय, ६७) असे गंभीर जखमी असलेल्या डॉक्टरांचे नाव आहे.

मस्जिदमध्ये नमाज पठणासाठी गेले होते : पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जखमी डॉक्टर कपिल अहमद हे भिवंडीतील मेट्रो भागातील ताज मंजिलमध्ये राहत असून त्यांचा दवाखाना भिवंडीतील पांजरापोळ परिसरात आहे. तर हल्लेखोर अताउल्लाह हा मूळचा उत्तरप्रदेश मधील भट्टी देवरियाचा रहिवाशी असून तो पांजरापोळ भागातील एका यंत्रमाग कारखान्यात लुम कामगार म्हणून काम करतो. त्यातच २७ मार्च रोजी सकाळच्या सुमारास डॉक्टर कपिल अहमद हे भिवंडीतील वंजारपट्टी परिसरात असलेल्या बहार ए मदिना मस्जिदमध्ये नमाज पठणासाठी गेले होते.

नागरीकांनी हल्लेखोराला पकडून चोपले: त्यानंतर नमाज पठण करून ते वंजारपट्टी भागातील मुख्य रस्त्यावर सोमवारी सकाळच्या सुमारास पार्क केलेल्या आपल्या कारकडे पायी जात असतानाच, हल्लेखोर अताउल्लाह याने पाठीमागून येऊन त्यांच्यावर हातोडीने डोक्यावर हल्ला केला. या हल्ल्यात डॉक्टर गंभीर झाल्याचे पाहून काही नागरीकांनी हल्लेखोराला पकडून चोपले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन हल्लेखोराला ताब्यात घेतले. तर डॉक्टर कपिल अहमद यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

हल्ल्याचे कारण अद्यापही गुलदस्तात : डॉक्टर कपिल अहमद यांच्या तक्रारीवरून हल्लेखोर अताउल्लाहवर भादंवि कलम ३२६ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. याबाबत तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ए. डी. पवार यांच्याशी संपर्क साधला असता, अटक हल्लेखोराला (आज) २८ मार्च रोजी दुपारनंतर भिवंडी न्यायालयात हजर केले जाणार असून हल्ल्याचे कारण अद्यापही समोर आले नसल्याने तपास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : Nitin Gadkari Threat Case : नितीन गडकरींना खंडणी मागणारा अटकेत; 'ही' महत्वाची माहिती समोर

Last Updated : Mar 28, 2023, 9:33 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.