ETV Bharat / state

डॉक्टरी पेशाला काळिमा! ओपीडी रुममध्येच डॉक्टरचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार - ठाणे बातमी

डॉक्टरी पेशाला काळिमा फासणारी ही घटना भिवंडी शहरातील गुलजारनगर भागात असलेल्या एका खासगी रुग्णालयात घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात आरोपी डॉक्टरविरोधात पोक्सोसह अत्याचाराचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

डॉक्टरी पेशाला काळिमा! ओपीडी रुममध्येच हैवान डॉक्टरचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

author img

By

Published : Aug 7, 2020, 12:31 PM IST

ठाणे - एक १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आजारी असल्याने ती उपचारासाठी रुग्णालयात गेली. त्यावेळी तिला तपासण्याच्या बहाण्याने ओपीडी रुममध्ये बोलावून एका हैवान डॉक्टराने तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टरी पेशाला काळिमा फासणारी ही घटना भिवंडी शहरातील गुलजारनगर भागात असलेल्या एका खासगी रुग्णालयात घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात आरोपी डॉक्टरविरोधात पोक्सोसह अत्याचाराचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. डॉ. बदरुजमा खान, असे गुन्हा दाखल झालेल्या अत्याचारी डॉक्टारचे नाव आहे.

अल्पवयीन पीडित मुलीसह तिच्या आईची प्रकृती बरी नव्हती. त्यामुळे मायलेकी गुलजारनगर येथील आरोपी डॉ. बदरुजमा खान याच्याकडे उपचारासाठी ३० जुलैला गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी डॉक्टरने दोघींनाही तपासून व उपचार करून परत दुसऱ्या दिवशी तपासण्यासाठी बोलावले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी मुलीची प्रकृती बरी नव्हती, तर घरी काम असल्यामुळे पीडित मुलीच्या आईने तिच्यासोबत १० वर्षांच्या लहान भावाला पाठवले होते. त्या दिवशी दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास पीडित मुलीचा तपासणीचा नंबर आला. मात्र, आरोपी डॉ. बदरुजमा याने नंबर येऊनही तिची तपासणी केली नाही. त्यामुळे पीडित मुलगी रुग्णालयात बसून होती. त्यानंतर आरोपीने तिला सर्वात शेवटी तपासण्यासाठी बोलावले, तर रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यालादेखील कामानिमित्त बाहेर पाठवले होते आणि पीडित मुलीसोबत आलेल्या तिच्या लहान भावाला पैसे सुट्टे आणण्याच्या बहाण्याने घरी पाठवले होते. दरम्यान, रुग्णालयात कुणीही नसल्याचा फायदा घेत तिला तपासणाच्या बहाण्याने आरोपी डॉक्टरने ओपीडी रुममध्ये बोलवून तिच्यावर अत्याचार केला.

या घटनेमुळे भयभीत झालेल्या पीडित मुलीने तिच्यावर घडलेला प्रसंग तिच्या मावशीला सांगितला असता मावशीला धक्काच बसला होता. त्यांनतर मावशीने पीडित मुलीच्या आईला आपल्या घरी बोलावून सदरचा प्रकार कथन केला. याप्रकरणी मुलीच्या आईने घटनेच्या पाच दिवसानंतर शांतीनगर पोलीस ठाण्यात नराधम डॉक्टरविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार शांतीनगर पोलिसांनी डॉक्टरविरोधात भादंस कलम 354 (ए) , 376 (2)( इ), 376 (सी) ( डी) सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र, डॉक्टरला अजूनही अटक केली नसून याप्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती शांतीनगर पोलिसांनी दिली आहे, तर दुसरीकडे कोरोनाच्या महामारीत जगभर डॉक्टर रुग्णांचे प्राण वाचवत असतानाच वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना भिवंडीत घडल्याने आरोपीविरोधात परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.