ETV Bharat / state

निधी वेळेत खर्च करण्यासाठी नियोजन करा, जिल्हाधिकारी यांचे आदेश - ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत विविध विभागांनी सन २०-२१ साठी घेतलेली विकास कामे वेळेत पूर्ण होतील याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. तसेच याबाबत सर्व संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

thane collector order news
मीरा भाईंदर जिल्हा वार्षिक योजना
author img

By

Published : Dec 25, 2020, 3:31 PM IST

ठाणे (मीरा भाईंदर) - जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत विविध विभागांनी सन २०-२१ साठी घेतलेली विकास कामे वेळेत पूर्ण होतील याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. तसेच याबाबत सर्व संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे. जिल्हा वार्षिक योजना,आदिवासी उपायोजना,अनुसूचित जाती योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे बैठक पार पडली. या बैठकित हे निर्देश देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते,जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे,समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त बलभीम शिंदे यांच्यासह सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
निधी मागणीचे प्रस्ताव सादर करावे

जिल्हाधिकारी नार्वेकर म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजनेमधून जिल्ह्यात विविध विकास कामांसाठी विभागांच्या मागणीनुसार निधीची तरतुद करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व संबंधित विभागांमार्फत करण्यात येणाऱ्या कामांना तांत्रिक व प्रशासकीय मंजूरी घेऊन निधीचे वितरण करण्यात आले आहे. तर अनेक विभागांनी अद्यापही निधी मागणीचे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीला सादर केलेले नाही. त्यांनी तात्काळ सुधारित प्रस्ताव सादर करावेत. जे विभाग लवकरात लवकर तांत्रिक मंजूरी, प्रशासकीय मान्यता घेऊन निधी मागणीचे प्रस्ताव सादर करणार नाही, त्यांना देण्यात आलेला निधी इतर विभागांना वर्ग करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखांवर निश्चित करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले. जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे यांनी सर्व विभागनिहाय उपलब्ध निधी आणि प्राप्त प्रस्ताव याबाबत सविस्तर माहिती दिली.

हेही वाचा - रिझर्व्ह बँकेकडून कोल्हापुरातील सुभद्रा बँकेचा परवाना रद्द

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.