ETV Bharat / state

Diwali Festival 2023 : महाराजांच्या किल्ल्यांना उरली नाही जागा; रस्त्यावर बनवला दिवाळीचा किल्ला - रस्त्यावर बनवला दिवाळी किल्ला

Diwali Festival 2023 : दिवाळी (Diwali) म्हटलं की, आपल्या समोर मातीचे किल्लेच येतात. लहान मुलांच्या दृष्टीनं ती एक महत्त्वाची गोष्ट मानली गेली आहे. परंतु सध्या मुलांना खेळण्यासाठी मैदानेच उरली नाहीत, तिथे किल्ले बनविण्यासाठी जागा तरी कुठून मिळणार. त्यामुळं ठाण्यातील मुले आता रस्त्यांवर माती कालवून किल्ले बनवत आहेत.

Diwali 2023
दिवाळी 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 7, 2023, 7:02 PM IST

Updated : Nov 7, 2023, 7:44 PM IST

माहिती देताना कलाकार

ठाणे Diwali Festival 2023: फराळ पणत्या, कंदील, फटाके यांच्यासह माती दगडांचे किल्ले बनविणं हा देखील दिवाळीचा (Diwali) अविभाज्य भाग आहे. लहान मुले माती, दगड, विटा जमवून सुरेख किल्ले साकारत असतात. परंतु शहरांचे आधुनिकीकरण झाल्यानंतर किल्ले बनवण्यासाठी जागाच उरली नसल्याचं विदारक चित्र सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळं रस्ते आणि पदपथांवर किल्ले बनवण्यावाचून मुलांसमोर कोणताच पर्याय उरलेला नाही.

बाजारामध्ये नागरिकांची गर्दी : दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा सण आता केवळ काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. घराघरात गृहिणींचे फराळ बनवण्यासाठी लगबग पाहायला मिळत आहे. संध्याकाळी कामावरून घरी जाताना कंदील, पणत्या, रांगोळ्या, तोरण इत्यादी सामान खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये नागरिकांची गर्दी दिसत आहे. याच गडबडीत काही मुलं मात्र रस्त्यांवर आणि पदपथांवर माती कालवून व दगड रचत किल्ले बनवताना दिसत आहेत.

शहरांचे आधुनिकीकरण झाले : पूर्वी किल्ले बनवणं हा प्रत्येक मुलाचा छंद होता आणि प्रत्येक घरासमोर दिवाळीत एक किल्ला पाहायला मिळत होता. या किल्ल्यावर सिंहासनावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे विकत घेण्यासाठी मुले खाऊमधील थोडे थोडे पैसे वाचवतात. आपला किल्ला सर्वोत्तम असावा यासाठी मुलं प्रचंड मेहनत घेतात. माती आणि दगडांच्या गोणी डोक्यावर घेत ही मुलं उत्साहाने किल्ल्याच्या बांधकामाला लागतात. रायगडाचे बांधकाम करणाऱ्या हिरोजी इंदुलकर यांच्याप्रमाणेच अभिमानाचे भाव प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतात. परंतु काळ बदलला आणि रस्त्या शहरांचे विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण झाले. मातीचे रस्ते जाऊन सिमेंट काँक्रीटचे पक्के रस्ते आले.

मुलांची मातीशी असलेली नाळच तुटली : पालकांच्या प्रचंड अपेक्षा आणि अभ्यासाच्या ओझ्याखाली मुलांचं बालपणच हरवून गेलं आहे. त्यातच मुलांच्या हाती मोबाईल आल्यानं त्यांची मातीशी असलेली नाळच तुटली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या सर्व कारणांमुळे किल्ले बनवण्याची कला हळूहळू कमी होत आहे. तरी काही मुलं आपल्या इतिहासाची आणि संस्कृतीची आठवण जपत किल्ले बनवताना दिसत आहेत.

किल्ले स्पर्धामुळे संस्कृती टिकली : मोठ्या मुश्किलीने मिळवलेली माती हाताने कालवून ती रचलेल्या दगडांवर लेपून किल्ले बनविले जात आहेत. अनेक ठिकाणी रस्ते आणि पदपथांवर हे किल्ले बनवले जात आहे. आता किल्ले बनवण्याच्या स्पर्धा देखील मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात येत आहेत. काळाच्या ओघात होत असलेली ही किल्ले बनवण्याची कला पुन्हा एकदा रुजावी यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. नव्या पिढीमध्ये हे बीज रुजवलं गेलंं तरच ही कला जिवंत राहील असं मत मुलांनी व्यक्त केलं.

हेही वाचा -

  1. Diwali Festival २०२३ : पणती व्यवसायाला उतरती कळा; ऐन दिवाळीत पणतीच्या भट्ट्या बंद
  2. Diwali २०२३ : बच्चे कंपनीसाठी 'चॉकलेट'ची दिवाळी; पंतप्रधानांनाही पाठवणार फराळ अन् फटाके
  3. Diwali Festival २०२३ : फराळ निघाला परदेशात; दिवाळीत ठाण्यातील पारंपरिक फराळाला मोठी मागणी

Last Updated : Nov 7, 2023, 7:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.