ETV Bharat / state

Diwali Festival २०२३ : फराळ निघाला परदेशात; दिवाळीत ठाण्यातील पारंपरिक फराळाला मोठी मागणी - दिवाळी 2023

Diwali Festival २०२३ : दिवाळी म्हटलं की, अनेकांच्या जिभेला पाणी सुटते ते म्हणजे दिवाळीतील फराळामुळे (Maharashtrian Diwali Food). दिवाळीजवळ येताच अनेकांच्या घरी फराळाला सुरुवात होते. भारतीय नागरिक पारंपरिक सण हे परदेशात राहून देखील मोठ्या उत्साहात साजरे करत असतात. मात्र, सणांमधील पारंपरिक पदार्थांची चव मात्र परदेशात मिळत नसल्यानं ठाण्यातील 'ऋतू फूड्स' या उद्योग समूहाला दर वर्षी याच पारंपरिक फराळाची ऑर्डर विदेशातून येत ( Diwali food export) असते.

Diwali food export
फराळ निघाला परदेशात
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 21, 2023, 8:32 PM IST

ठाण्यातील फराळ निघाला परदेशात

ठाणे : Diwali Festival २०२३ : दिवाळी (Diwali 2023) सण अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे. त्यामुळे दिवाळी (Diwali Faral) फराळाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच आपल्या परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी मोठ्या प्रमाणात फराळ पाठविण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू आहे. ठाण्यातील 'ऋतू फूड्स' या कंपनीत देखील अशीच घाई पाहायला मिळत आहे. फराळ बनविणं आणि पॅक करण्यात सर्वजण व्यस्त असलेलं चित्र दिसत आहे.

४० वर्षापासून जातो परदेशात फराळ : सर्वात मोठा सण दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आला असून त्याची तयारी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. दिवाळीत नवीन कपडे, कंदील, रांगोळी, दिवे पणत्यांसह दिवाळी फराळ हा एक मोठा अविभाज्य घटक आहे. पूर्वी रात्रं रात्रं जागून घरातील आजी, आई, मोठ्या बहिणी, वहिनी मिळून करंज्या, लाडू, चकल्या, चिवडा, शंकरपाळ्या, अनारसे असे एकाहून एक स्वादिष्ट आणि खुसखुशीत पदार्थ बनवत असत. परंतु आता काळ बदलला असून बहुतांश महिला वर्ग कामानिमित्त बाहेर राहू लागल्यानं तयार दिवाळी फराळ बाहेरून आणणं ही काळाची गरज झाली आहे. असाच खुमासदार घरगुती फराळ बनविणारी ठाण्यातील ऋतू फूड्स ही कंपनी गेली ४० वर्षे ठाणेकर खवय्यांची गरज भागवत आहे.

परदेशात मोठी मागणी आणि पुरवठा : हा आपला पारंपरिक फराळ परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांना देखील खाता यावा यासाठी आता मोठ्या प्रमाणात हा फराळ परदेशीं पाठवला जात आहे. अमेरिका, इंग्लंड, दुबई, कॅनडा, ऑस्ट्रेलिया सारख्या जगातील तब्बल ९ देशात हा फराळ कुरियरच्या माध्यमातून पाठविण्यात येतो. दरवर्षी त्याची मागणी वाढतच आहे. यावर्षी तब्बल ३५० ते ४०० किलो चकली त्याच प्रमाणात इतर पदार्थ देखील पाठवत असल्याची माहिती, ऋतू फूड्सचे मालक सुमंत परचुरे यांनी दिली. परदेशात वसलेल्या भारतीयांकडे वेळेचा अभाव आणि घरगुती चव यासाठी या फराळाला असलेली मागणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

हेही वाचा -

  1. फॉरेनला निघाला दिवाळीचा फराळ; यंदा परदेशात मागणी वाढल्याने घरगुती फराळाला अच्छे दिन
  2. Diwali Faral : यंदा दिवाळीत घरगुती फराळापेक्षा तयार फराळाला मागणी; परवडणाऱ्या दरात विक्री
  3. दिवाळीत फराळीने वजन वाढण्याची चिंता? या टिप्सने ठेवा नियंत्रणात!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.