ETV Bharat / state

लग्नात सॅनिटायझर आणि मास्कचं वाटप, फक्त ५० जणांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा - लग्नात सॅनिटायझर आणि मास्कचं वाटप

वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रत्येकालाच लग्न पुढे ढकलणे शक्य नाही. त्यामुळे अनेकजण घरघुती पद्धतीने अगदी थोडके लोक जमून लग्न करत आहेत. वाशीमध्ये अवघ्या ५० जणांच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पडला. या लग्नसोहळ्यात कोरोनासंदर्भात जनजागृती करण्यात आली.

Distribution of sanitizer and mask at the wedding ceremony in Navi mumbai
लग्नात सॅनिटायझर आणि मास्कचं वाटप
author img

By

Published : Mar 21, 2020, 12:19 PM IST

नवी मुंबई - दिवसें दिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून सार्वजनिक सोहळे करु नका, असे आवाहन शासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यात मार्च महिना लग्नाचा सीझन आहे. अनेकांनी लग्नासाठी हॉल बुक केले आहेत. अनेकांनी पत्रिकाही छापल्या आहेत. मात्र, वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रत्येकालाच लग्न पुढे ढकलणे शक्य नाही. त्यामुळे अनेकजण घरघुती पद्धतीने अगदी थोडके लोक जमून लग्न करत आहेत. तर काहीजण लग्न समारंभातून कोरोनाबद्दल जनजागृती करताना दिसत आहेत.

फक्त ५० जणांच्या उपस्थितीत पार पडला लग्नसोहळा

वाशीतील एका कुटुंबाला लग्न पुढे ढकलणं शक्य नव्हतं. त्यामुळे फक्त ५० माणसांच्या उपस्थितीत घरघुती पद्धतीने हा लग्न सोहळा पार पडला. विशेष म्हणजे या लग्न सोहळ्यात कोरोनाची जगजागृती करण्याचा प्रयत्न केला. लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांना हँड सॅनिटायझर, मास्कचं वाटप देखील करण्यात आलं. इतकंच काय तर खबरदारी म्हणून लग्नातील वऱ्हाड्यांना बंद डब्यातील जेवण देण्यात आलं. जमावबंदी असल्याने या लग्नाला दोन्ही घरातील फक्त 50 पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्न समारंभ पार पडला.

Navi mumbai

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.