ETV Bharat / state

ठाण्यात तडीपार गुंडांचा धुमाकूळ सुरूच, हातात तलवारी घेऊन भररस्त्यात हाणामारी - दोन गट हाणामारी ठाणे

ठाण्यात पोलिसांचा धाक अजिबात राहिला नाही हे या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे. गुंडांच्या दहशतीमुळे या परिसरात जाण्यास ठाणेकरांची हिम्मत होत नाही. त्यामुळे ठाण्यात कायदा व सुव्यवस्थेचे ३-१३ वाजेलत का? ठाण्यात ठाणे पोलिसांचा की तडीपार गुंडांचा राज आहे? असे एक ना अनेक प्रश्न ठाणेकरांना पडले आहेत.

thane two groups dispute
ठाण्यात तडीपार गुंडांचा धुमाकूळ सुरूच
author img

By

Published : Feb 26, 2020, 3:22 PM IST

ठाणे - शहरातील वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री अचानक दोन गटात तुफान हाणामारीची घटना घडली. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून गुंड हातात तलवारी घेऊन अगदी फिल्मी स्टाईलने एकमेंकांच्या मागे धावत होते. भर रस्त्यात हा प्रकार सुरू होता.

ठाण्यात तडीपार गुंडांचा धुमाकूळ सुरूच, हातात तलवारी घेऊन भररस्त्यात हाणामारी

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी तडीपार असलेला अनिकेत आमले या गुंडाला पोलिसांनी ताब्यात घेतले, तर इतर गुंडांचा शोध सुरू आहे. सोनू पाल आणि सचिन कान्या हे देखील तडीपार गुंड या हाणामारीत सहभागी असल्याचा संशय वागळे इस्टेट पोलिसांना आहे.

ठाण्यात पोलिसांचा धाक अजिबात राहिला नाही हे या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे. गुंडांच्या दहशतीमुळे या परिसरात जाण्यास ठाणेकरांची हिम्मत होत नाही. त्यामुळे ठाण्यात कायदा व सुव्यवस्थेचे ३-१३ वाजेलत का? ठाण्यात ठाणे पोलिसांचा की तडीपार गुंडांचा राज आहे? असे एक ना अनेक प्रश्न ठाणेकरांना पडले आहेत.

अशा गुंडांवर दादा भाईंचा वरदहस्त असल्याने ठाणे पोलीस डोळ्यावर पट्टी लावून बसतात. या गुंडाना स्थानिक नेते आणि शिवसेनेच्या काही बड्या नेत्यांच्या आशीर्वाद असल्यामुळे पोलीस कारवाई करत नाहीत, असा आरोप स्थानिक करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.